लोकहिताची कामं करताना टीका टिपण्यांकडे दुर्लक्ष करा – लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर

नालासोपारा (प्रतिनिधी) : लोकहिताची कामं करताना आपला हेतू खरा असला पाहिजे. हत्तीच्या चालीने कामं करा, कोण काय टीका टिपण्या करतय तिकडे दुर्लक्ष करा, तरच तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल.छोटी छोटी कामं हाती घ्या पण ती पूर्ण करा. विशेषत: आपल्या भागातील महिला व वयस्कांच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्या.आपला वसई तालुका हा मिनी हिंदुस्तान आहे, सर्व जाती धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. केवळ उत्तर भारतीयच नव्हे तर इतर राज्यांतील लोकांचाही आदर केला जावा.आपल्या संस्क्रीतीचे एकमेकात मिसळणे यातच सर्वधर्मसमभाव तत्व सामावले आहे,असे ते म्हणाले, अशा शब्दात लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांना काल येथे मार्गदर्शन केले.

 उत्तर भारतीय महासंघाने आयोजित केलेल्या 14 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात ते नालासोपारा पूर्वेला सेंट्रल पार्क -विरार रोडवरील मैदान येथे बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष राधेश्याम मिश्रा व कार्याध्यक्ष प्रदीप सिंह यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

भोजपुरी संगीत क्षेत्रातील.प्रसिध्द गायिका राधा मौर्या,अनिल गौतम व सहकार्यांनी यंदाचा रंगारंग कार्यक्रम चांगलाच रंगवला.याच कार्यक्रमात महासंघाने तालुक्यातील 15 बहुभाषी पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. तर वकील अंजली मिश्रा व मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या रमाकांत वाघचौडे यांनाही गौरविण्यात आले.90 फुटी रोडवरील रिक्षा स्टैंड मैदान खचाखच भरले होते. हजारो उपस्थितांनी भोजपुरी व हिंदी गीतांसह शास्त्रीय नर्तन कलाविष्काराचा आनंद लुटला.

या कार्यक्रमात प्रथम महापौर राजीव पाटील हे सुध्दा सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या ब्रिजेश यादव, समाजसेवक हाजी नायडू, नगरसेवक किशोर नाना पाटील, समाजसेवक संजय सिंह,शंकर मिश्रा, पत्रकार आर.के.सिंह,रामजतन गुप्ता, विजय देसाई, विजय गायकवाड,नगरसेविका सलुमुनिसा सोमानी, गायक कलावंत राधा मौर्या,सुजीतकुमार गौतम,प्रियांका सिंह,स्नेहलता ई.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळयाचे सूत्रसंचालन अमजद अली सोमानी यांनी केले.

बहुजन विकास आघाडी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार बळीराम जाधव,ज्येष्ठ नेते अब्दुलहक पटेल, काशिनाथ पाटील,भरत गुप्ता,भरत मकवाना,प्रभाग समिती सभापती सरिता दुबे, चिरायु चौधरी, माजी सभापती टिकोरी मिश्रा, नगरसेवक व कार्यकर्ते सिताराम गुप्ता,निलेश चौधरी,महासंघाचे अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या स्वागत व सत्कार सोहळयाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदीप सिंह यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!