वंचित बहुजनांची निवडणूक आयोगाला आर्त हाक

वसई (वार्ताहर) : ईव्हीएमद्वारे होणारी मतदानाची चोरी थांबवा आणि लोकशाही वाचवा अशी आर्त हाक वंचित बहुजनांच्या भारिप बहुजन महासंघाने भारतीय निवडणूक आयोगाला दिली आहे.ही हाक आयोगापर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवारी दुपारी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत अनेक ठिकाणच्या ईव्हिएम मशीनमधील घोटाळा उघडकिस आला होता.झालेले मतदान आणि मतमोजणी यांच्यात बरीच तफावत दिसून आली.सबळ पुरावा देवूनही विडणूक आयोगाने या प्रकाराकडे कानाडोळा केला होता.त्यामुळे मतदानाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या चोरीमुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास ढळत चालला आहे.परिणामी आगामी निवडणूका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्यात,तसेच झालेल्या लोकसभा निवडणूकाही बॅलेट पेपरमधूनच घ्याव्यात.अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे.

या मागणीसाठी काल दुपारी १२ वाजता चिमाजी आप्पा मैदान वसई येथून तहसिलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश वाघमारे,जेष्ठ कार्यकर्ते लल्लन गौड,सरचिटणीस महेश हाटे, संघटक सिध्दार्थ शिर्के, राजु लोखंडे,युवा जिल्हा अध्यक्ष प्रफुल हळदे, राहूल तेलगोटे, मधुकर सोनकांबळे गुरुनाथ मोहिते,जुबेदा शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी या मोर्च्यात सहभागी झाले होते.थाळीनाद करून या मोर्च्याची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!