वंचित विद्यार्थयांसाठी माजी विद्यार्थयांतर्फे स्मार्टफोन्स भेट

वसई (राजेश सोनी) : कोविड-१९ या महामारीच्या अत्यंत निराशाजनक परिस्थितीत गरीब पार्श्वभूमीतील बरेच विद्यार्थी ज्यांचे पालक स्मार्टफोन घेऊ शकत नाहीत, ती मुले शाळेने आयोजित केलेल्या ऑनलाइन शिक्षण वर्गात प्रवेश करण्यापासून पूर्णपणे वंचित राहतील, याच कारणामुळे खरोखर चांगली बातमी आहे की काही माजी विद्यार्थी या परिस्थितीवर उपाय म्हणून प्रयत्न करीत आहेत.
सेंट ऑगस्टीन स्कूलचे (वसई) चे १९८९ एस.एस.सी बॅचच्या विद्यार्थी गिरीश शेट्टी, विल्टन रेमेडीओज, ब्रायन डिकुन्हा आणि त्यांच्या जवळच्या काही मित्रांनी शाळेसाठी २४ स्मार्टफोन्स प्रायोजित केले. फोन्सची पहिली तुकडी त्यांनी काही दिवसापूर्वी शाळेला दिली. “हा उपक्रम नक्कीच आमचे संस्थापक एडमंड राईस यांच्या भावनांच्या अनुषंगाने चालत आहे, ज्यांचा वंचितांचा आणि अल्पसंख्याकांची काळजी घेण्याचा असा वारसा आहे जे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आतापर्यंत प्रेरित करीत आहे,” अशी भावना एका माजी विद्यार्थयांनी व्यक्त केली. तो पुढे म्हणाला की “या स्मार्टफोन प्रकल्प मागे अशी कल्पना आहे की विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण वेळ संपेपर्यंत या फोन्स चे वापर करू शकतील. त्यानंतर हे फोन्स भविष्यात इंटरनेट आधारित शिक्षण घेण्यासाठी शाळेतील अन्य विद्यार्थयांसाठी उपयोगी ठरतील. मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन एप्टीट्यूड टेस्ट घेत असलेले एस.एस.सी चे विद्यार्थी भविष्यात या परीक्षेसाठी या फोन्सचा वापर करू शकतील. एस.एस.सी च्या या बॅचने आयोजित केलेला हा दुसरा प्रकल्प आहे. गेल्या वर्षी त्यांनी शाळेसाठी ७५ फोल्डेबल डेस्कची व्यवस्था करून दिली होती, ज्यांचा वापर आता परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांद्वारे करण्यात येत आहे.
सेंट ऑगस्टीन स्कूलचे व्यवस्थापन या दोन्ही प्रकल्पांमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!