वनवासी महिलांचे महिला दिनानिमीत्त आवाहन ; सन्मान नको,वस्तु खरेदी करून रोजगार द्या

वसई (वार्ताहर) : महिला दिनी आमचा सन्मान करु नका पण आम्ही तयार केलेल्या वस्तु खरेदी करून रोजगार द्या असे कळकळीचे आवाहन वसईच्या दुर्गम ग्रामीण पट्टयातील वनवासी महिलांनी केले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत भालीवली गावात विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर आहे.ग्रामीण भागीतील उपेक्षीत विद्यार्थी,महिला आणि शेतकऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या विवेकने शाळेचे तोंडही पाहु न शकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना कॉलेजचा रस्ता दाखवला आहे.तसेच रोजगार नसल्यामुळे उपासमारीला तोंड देणाऱ्या अनेक वनवासी महिलांना बांबु प्रशिक्षण देवून रोजगार मिळवून दिला आहे.विवेकच्या राष्ट्र सेवा समिती ग्राम विकास केंद्राने वनवासी महिला,मुलींना केसांच्या ्लीप,ट्रे, मोबाईल स्टॅण्ड,की स्टॅण्ड,गिफ्ट बॉ्स,आराम खुर्ची,फुट ट्रे अशा वस्तु वनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

या वस्तु केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.त्यांच्या विक्रीतून होणारा नफा वनवासी महिलांना देण्यात येतो.त्यामुळे या महिलांच्या घराची चुल पेटत आहे. ८ मार्चला जागतिक महिला दिन आहे.या दिवशी सर्वत्र महिलांचा जाहीर सन्मान करण्यात येतो.त्यासाठी त्यांना भेटवस्तुही देण्यात येतात.या वस्तु आमच्या केंद्रातून खरेदी करा,त्यामुळे आमची एक दिवसाची चुल पेटेल हाच आमचा सन्मान असेल.असे आवाहन या महिलांनी केले आहे.त्यासाठी चला तर मग तिला साथ देऊया असे आवाहन अश्विनी पारखी यांनी केले असून,वस्तु खरेदी करण्यासाठी9284375895 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!