वसईचा कृषि परिसर अजूनही आशादायक – किरण सुरवसे

सहजीवन नाताळ ट्रेडफेअरचे शानदार उद्धाटन

वसई (वार्ताहर) : वसईच्या पश्चिम पट्टयातील कृषी परिसर अजूनही पर्यावरणपूरक आणि सुपीक असल्यामुळे येथील शेती उत्पादनाला चांगला वाव आहे आणि म्हणूनच कृषी अभ्यासक आणि वसईचा तहसिलदार म्हणून मी आपल्याला शासन सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन. येथील शेतकरी, महिला बचतगट या संदर्भात मी चांगलाच अवगत असून अशा ट्रेड फेअरच्या माध्यमातून आपल्या संस्था शेतकरी, महिला त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचा सणासुदीच्या काळात त्यांचा आनंद वाढवतात ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे असे प्रतिपादन वसईचे तहसिलदार किरण सुरवसे यांनी केले. मर्सिस येथील सुखसंपत्ती संवर्धन सोसायटी आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठान आयोजित आणि बॅसिन कॅथोलिक बँक पुरस्कृत सहजीवन टे्रडफेअरच्या उद्धाटन प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात सुखसंपत्ती सोसायटीचे चेअरमन ओनिल आल्मेडा हे म्हणाले की, संस्थेच्या ह्या गेल्या नऊ वर्षांच्या ट्रेडफेअर उपक्रमाबद्दल माहिती देताना उपस्थित बँक अधिकारी, तहसिलदार, महापौर यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून यापुढे संस्था या सर्वांच्या सहकार्याने तसेच सर्वसामान्यांच्या सूचना आणि आकांक्षाप्रमाणे काम करेल असे सूचित केले. या ट्रेडफेयरचे उद्धाटन वसईचे प्रथम नागरीक श्री.प्रविण शेट्टी यांनी उद्धाटक म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना, मला या परिसराबद्दल नितांत आदर आणि कौतुक आहे असे सांगून महानगरपालिका आणि व्यक्तीश: मला येथील प्रश्नांची आणि अपेक्षांची पुर्णत: माहिती अवगत असल्याचे सांगून मी नेहमीच आपल्या कामांसाठी कटीबध्द आहे असे त्यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमात प्रासंगिक मनोगतात बोलताना सविता पावसकर यांनी महिला बचतगटाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. मांगीलाल कुंदे यांनी खाद्य तेलाच्या उत्पादनाबद्दल उद्योजक म्हणून त्या तेलाच्या नैसर्गिकतेबद्दल उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली.जयानंद भारती यांनी बँक ऑफ महाराष्ट्र सुध्दा अशा ग्रामीण आणि शहरी भांगातील सर्वसामान्यांच्या सुविधांसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे हे सांगताना सर्वसामान्यांनी कधीही आपल्या सूचना आणि समस्या घेवून आल्यास त्यांचे स्वागतच होईल अशा तऱ्हेने उपस्थितांना आश्वासित केले. त्याचबरोबर उपस्थितांमध्ये असलेल्या महिला बचतगट अधिकारी यांनी महत्त्वपूर्ण सूचना उपस्थितांना केल्या. यावेळी वसई विरार शहर महानगरपालिका ‘आय’ प्रभागाचे नवनिर्वाचित सभापती लॉरेल डॉयस यांचाही सन्मान करण्यात आला. या उद्धाटन सोहळयात प्राची कोलासो, छगन नाईक, विश्वनाथ राऊत, अंकुश पाटील, प्रविणा चौधरी, सिल्वेस्टर परेरा, ज्यो मच्याडो, नरेंद्र चौधरी, रविंद्र माने आदि उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत व ओळख तसेच सूत्रसंचालन संदीप राऊत यांनी केले, आभार प्रदर्शन स्टॅनी आल्मेडा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलेक्झांडर डिमेलो, स्टॅनी रॉड्रीक्स, ऑबरी मेरीट, पॅट्रीक घान्सालवीस, डायना डिसील्वा, भोरज करवालो, स्टॅनी आल्मेडा या कार्यकर्त्यांनी व सहजीवन हॉलचे प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली. महापौर प्रविण शेट्टी यांनी उद्धाटन केल्यानंतर रात्री कॅरल सिंगींग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेलाही उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे नियोजन ऍलेक्सझांडर डिमेलो यांनी केले व प्रशिक्षण दिलीप भट्टाचार्य यांनी केले. मंगळवार ते शुक्रवार या काळात हे ट्रेडफेयर चालणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!