वसईच्या चर्चचं कार्य गौरवास्पद – फादर आर्तुरो सोसा

वसई (प्रतिनिधी) : ख्रिस्ती धर्माने वसईत उत्तम विचारांची लागवड केली. त्यांनी येथे उभ्या केलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मनुष्य धर्माची स्थापना केली. तळागाळातील जनतेच्या अभ्युदयासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, म्हणूनच संपूर्ण जगातलं सुंदर चर्च वसईत उभ राहू शकलं, त्याच दैदिप्यमान परंपरेला नमस्कार करण्यासाठी मी वसईत आलेलो आहे असे भावपूर्ण उद्गार रोमवरून आलेले अखील जेज्वीट पंथाचे प्रमुख, ब्लॅक पोप आर्तुरो सोसा यांनी रविवार दि. 3 मार्च 2019 रोजी माणिकपूर चर्चच्या भव्य प्रांगणात संपन्न झालेल्या सोहळयावेळी बोलताना काढले.
माणिकपूर येथील संत मायकल चर्च संचलीत शिक्षणसंस्थांचा वर्धापनदिन व गोखिवरे येथील संत रॉक चर्चच्या अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांनी येथील भाविकांचे विशेष आभार मानले.

Pप्रारंभी माणिकपूर चर्चच्या आवारातून खास वसईच्या संस्कृतीला अनुसरून बँड व लेझीमच्या साथीने फादर सोसा यांची मीरवणूक काढण्यात आली. फादर सोसा आपल्या मनोगतात पुढे म्हणाले उत्तम संस्कार झालेला माणुस आपल्या हृदयातून उत्तम गोष्टी करीत असतो. माणसाला चांगुलपणा, प्रेम, दया आणि क्षमेचं वरदान देण्याचं कार्य धर्म करीत असतो. माणसाची मुक्ती हीच धर्माची प्रथम आणि अंतीम फलश्रुती असावी त्यासाठी धार्मिक नेत्यांनी कसून प्रयत्न करणे गरजेचं आहे. वसईतल्या चर्चने संपूर्ण जगाला मार्गदर्शक असं कार्य केलेलं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी येथे आलेलो आहे. तुमचं प्रेम आणि श्रध्दा पाहून मी भारावून गेलो आहे येथून मी प्रेमाचा आणि शांतीचा संदेश घेऊनच मायदेशी परतेन. वसईला ख्रिस्ती धर्माची शिक्षा देणारे जेज्वीट पंथाचे सहसंस्थापक संत फ्रान्सिस झेवीअर व वसईकर संत घोन्सालो गार्सिया यांच्यासाठी त्यांनी यावेळी दराने गौरवोद्गार काढले. वसई आणि विशेषत: माणिकपूर परिसरात चर्चने केलेल्या. भव्यदिव्य कार्याचा आढावा लोकशाहीर जुरान लोपीस यांनी आपल्या पथनाटयाद्वारे घेतला. डोळयाचं पारणं फेडणारं हे नृत्यनाटय म्हणजे श्रध्देचा मनोहारी प्रवास होता. फादर सोसा यांना वसईची सुकेळी व संत मायकल चर्चची प्रतिकृती भेट देण्यात आली.
संत मायकल चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर निलम लोपीस यांनी स्वागत तर फादर सिझर फरोज यांनी आभार मानले. कार्यक्रमाचं नेटकं व सोहळयाला स्वर्गीय उंचीवर नेणारं सूत्रसंचालन संगिता सेरेजो व प्रिया मिनेजिस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!