वसईच्या रोनाल्ड सिक्वेरा यांनी नासाच्या शास्त्रज्ञनाला सादर केले आपले संशोधन

वसई  (प्रतिनिधी) :  वसईचे सुप्रसिध्द काष्टशिल्पकार व खगोल शास्त्राचे गाढे अभ्यासक रोनाल्ड सिक्वेरा यांनी नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांना त्यांनी स्वत: तयार केलेल्या संशोधनातुन निर्मिलेल्या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवले. या दोघांची गाठभेट भाजपाचे वरिष्ठ नेते केदारनाथजी म्हात्रे यांनी नुकताच घडवून आणली.

सिक्वेरा यांनी तयार केलेली मॉडेल्स व त्याची अचूकता पाहुन प्रणित पाटील भारावून गेले. सिक्वेरा यांच्या या मॉडेल्सना इसरोने मान्यतेचे सर्टिफिकेट यापूर्वीच दिले आहे. या मॉडेल्सची पेटेंट नोंदवले जावे म्हणून सिक्वेरांनी2013 सालीच भारतात संबंधीत विभागाकडे अर्ज केला आहे.

इंडियन पेटंट मिळावे व नासा संस्थेकडे हा प्रोजेक्ट सादर करण्यासाठी मी आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करीन असे अश्वासन नासाचे प्रणित पाटील यांनी या वेळी सिक्वेरा यांना दिले,जगांत आपली अप्रतिम शिल्पे पाठवणारे व खगोल शास्त्रात अप्रतिम कामगिरी केलेल्या वसईच्या या गुणवंत व्यक्तीची महाराष्ट्र सरकार व भारत सरकारनेही नोंद घ्यावयास हवी अशी भावना केदारनाथ म्हात्रे यांनी आमच्याकडे व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!