वसईच्या विद्यार्थ्यांचा व्हिएतनाम येथे भरलेल्या गणित आणि विज्ञान स्पर्धेत यशस्वी सहभाग

वसई : २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर मध्ये व्हिएतनाम येथे झालेल्या १६ व्या आंतरराष्ट्रीय गणित आणि विज्ञान विषयाच्या स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त झालेआहे. ह्या स्पर्धेत एकूण २४ देशातील १३ वर्षा खाली लमुलांनी भाग घेतला होता. स्पर्धा अतिशय चुरशीची झाली.  ह्या स्पर्धेत डॉ.म.ग.परूळेकर मित्र मंडळाच्या आर.व्ही.नेरकर शाळेच्या १२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ह्या स्पर्धेत सायन्स विभागाचे कांस्यपदक कुमार निरज नंदनवार ह्यांस मिळाले. त्याच प्रमाणे नृत्यास (कला विभाग) सर्व देशांतून आर.व्ही.नेरकर शाळेच्या नृत्यांस प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झाले.

विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका सौ.प्राजक्ता पाटील व सुपरवाइझर सौ.शुभदा आरोळे, श्री.विनय जोशी, श्री.धनंजय राऊत, सौ.दिपिका ठाकूर, श्री.चाफेकर (न्यू इंग्लिश स्कुल) श्री. मेहेरसर, श्री.डोंगरे (वर्तक कॉलेज) ह्यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच प्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा चौधरी ह्यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. व्ही. नेरकरशाळा ह्या स्पर्धेत २०१४ साला पासून भाग घेत आहे. त्यात शाळेच्या मुलांनी विज्ञान, गणित व कला विभागाची पारितोषिके मिळवली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावत आहेव त्यामुळे विविध परीक्षा स्पर्धेत घवघवीत यश मिळत आहे. आतापर्यंत शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकयांनी ह्या स्पर्धेसाठी थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, चायना व व्हिएतनाम ह्या देशांना भेटी दिल्या आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी भारतात बहुधा आर.व्ही. नेरकर ही एकमेव शाळा असावी असे वाटते. सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुयश चिंततो.

 स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे :

गणित विभाग : कु.क्षितीज मंगेश बगाटे.,  कु.आर्यन विलास पाटील., कु.आर्यन उदयकुमार बाबर देसाई., कु.अथर्व चंद्रशेखर राऊत.,  कु.जुईवैभव प्रभु देसाई.,कु.दिशा राजेश परब.

विज्ञान विभाग :  कु.नीरज निशा नंदनवार., कु.हर्षित अंकुर पवार., कु.राजस तुषार अभ्यंकर., कु.राजसी राजेश जोशी., कु.यश्वी उमेश धामणकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: