वसईच्या श्रध्दा मोरे “महाराष्ट्र सन्मान २०२०” ने सन्मानित

वसई (वार्ताहर) : शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र सन्मान २०२० या स्पर्धेत वसईच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रध्दा संदिप मोरे यांना सामाजिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्धाटन अभिनेत्री विजया पाडव, शिर्डीचे सहा. पोलीस अधिक्षक पी. एस. बाणे, साई अर्पण फाऊंडेशनच्या सचिव जयश्री माई सावर्डेकर, अध्यक्ष स्थायी स्वप्निल वाडेकर (लेखक) पत्रकार उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करताना श्रध्दा मोरे म्हणाल्या की, मला आत्तापर्यंत खुप पुरस्कार मिळाले, पण शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी मला पुरस्कार मिळण्याचे भाग्य मला लाभले. हा माझ्या आयुष्यातील फार मोठा ठेवा आहे. याप्रसंगी साहित्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या एकूण १४ गुणिजनांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची कांदळ गावकर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सोमनाथ गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, मैत्री संस्था तथा सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीचे सुरज भोईर यांनी केले. या कार्यक्रमासाठी खासदार व शिर्डी  संस्थानचे विशवस्त भाऊसाहेब वाकचौरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.धुमाळ यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: