वसईतील एकांकिका स्पर्धेत सुंदर ते ध्यान ठरली अव्वल

वसई (प्रतिनिधी) : येथील सोमवंशी क्षत्रीय समाज महामंडळाच्या वतीने वसईत स्व.अनंतराव ठाकूर नाटयमंदिरात ‘बाल उत्सव’ हा समाजाचा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच साजरा झाला. या उत्सवात एकांकिका स्पर्धेचा समावेश असल्याने या उपक्रमाला वेगळी उंची व रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेचे औपचारिक उदघाटन ज्येष्ठ नाटय-सिने अभिनेते प्रदीप कबरे यांच्या हस्ते करण्यात आले. समाज महामंडळाचे पदाधिकारी, अनेक रंगकर्मी,ज्येष्ठ साहित्यिक,शिक्षक या वेळी रंगमंचावर उपस्थित होते.

  इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले मात्र रसिकांची गर्दी होती ती एकांकिका स्पर्धेला. समाज मर्यादित स्पर्धा असूनही 5 नाटय संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत खुंतोडी संघाच्या ‘सुंदर ते ध्यान’ या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला. तर उमेळेच्या ‘चक्री ‘ ला दुसरे आणि मांडळईच्या ‘खेळ मांडियेला’ या एकांकिकेस तिसरे पारितोषिक मिळाले. किरवली ची ‘पूर्ण ब्रम्ह’ आणि’मुळगावची स्वप्नांच्या पल्याड’ या प्रयोगांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.

  इतर प्रमुख पारितोषिके,. दिग्दर्शन – निलेश गोपनारायण., लेखन – संजना पडले., संगीत – संदेश चौधरी., अभिनय – वरद पाटील., अभिनय (स्त्री) जिशा चौधरी., अभिनयाची प्रमाणपत्रं, पारस वर्तक, शार्विल वर्तक,तिया वर्तक, मिहिका पाटील आणि पर्वणी वर्तक या कलावंतांना प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते व नाटय प्रशिक्षक प्रदीप कबरे व दिनेश गायकवाड यांनी या स्पर्धेत परिक्षक म्हणून कामकाज सांभाळले.

 या प्रसंगी बोलताना प्रदीप कबरे यांनी स्पर्धक, शिक्षक,दिग्दर्शक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विषयाची निवड, तो विषय नाटय रुपात प्रभावीपणे मांडणे आणि रसिकांची दाद मिळवणे हे नाटय कलेचे महत्त्वाचे अंग आहे. कमी वेळ आणि रंगमंच वापर याची जाण व भान स्पर्धकांनी ठेवावे लागते. सिनेमा व नाटक सादरीकरण यातील फरक कळला की प्रयोगात किती ब्लॅक आऊट असावेत हे दिग्दर्शकाला कळते. वारंवारच्या ब्लॅक आऊट मुळे रसिकांचा रसभंग होतो आणि नाटकावरची पक्कड सुटते. सांघिक कसरती आणि त्यातून विषय मांडणी प्रत्येक वेळी सफल होतेच असे नाही. मुलांकडून उत्तम कायिक,वाचिक व मुद्राभिनय काढून घेण्यावर दिग्दर्शक वा शिक्षकांनी भर द्यावा. टीव्ही वर जे चालले आहे तेच चांगले असते असा समज होता कामा नये. सहज सोपे आणि रसिकांना खिळवून ठेवणे जमले पाहिजे. तसा प्रयत्न करा आणि नव लेखकांना लाभदायक ठरेल अशी कार्यशाळा आयोजित करावी असे आवाहन सुध्दा प्रदीप कबरे यांनी केले.

उत्सव सुरु करताना वसईचे जुन्या पिढीचे दिग्गज रंगकर्मी मास्टर दत्ताराम,अनंतराव ठाकूर व परशुराम सामंत यांच्या कला साधनेस महामंडळाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. दुपारी एकला सुरू झालेला हा बालमहोत्सव एक विश्रांती घेत रात्री नऊ पर्यंत रंगला. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र राऊत, कार्याध्यक्ष मिलिंद म्हात्रे पदाधिकारी लेखक अरविंद म्हात्रे, पंकज वर्तक, कवयित्री व आदर्श शिक्षिका हेमलता राऊत, मकरंद सावे,अभिनेते निलेश सावे या मान्यवरांच्या भरीव योगदानामुळे हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी झाला.

पर्यावरणाला पोषक असा नारळाच्या काथ्यापासून बनविलेल्या विविध वस्तू उदा.कॉयरपित, कॉयरफायबर यापासून कुंडी, हँगिंग बास्केट, कोईरपोल, कॉयर मॅटिन, रशी, चटई(पायपुसणी), गादी इत्यादी लोकोपयोगी वस्तू कमी किमतीत पहिल्या प्रथमच विरारमध्ये श्री बालाजी कॉयर प्रॉडक्टस च्या माध्यमातून जनतेच्या सेवेस उपल्ब्ध आहे ह्या प्रसंगी वसई विरार शहर महानगरपालिका चे प्रथम महापौर श्री राजीव पाटील यांच्या हस्ते ह्या कॉयर उदयोगाशी सम्बधित दुकानाचे उदघाटन झाले.यावेळी कॉयर बोर्ड कोकण विभागाचे विभाग प्रमुख श्रीनिवासन साहेब ,माताजी वीणा चव्हाण,दर्शन सरय्या, विकास चव्हाण, ई.मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!