वसईतील गुंडगिरी मोडण्यासाठी जिंकायचंय – उध्दव ठाकरे

वसई (वार्ताहर) :  इथली गुंडगिरी कायमची मोडून काढण्यासाठी जिंकायचे आहे.असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वसईतील आपल्या दौऱ्यात कार्यकर्त्यांना दिला.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे यांनी आज वसईतून आपल्या दोऱ्याला सुरवात केली.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बापाणेजवळ शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर फादरवाडी गोखिवरे,अंबाडीरोड वसई,बिशप हाऊस बाभोळा,चिमाजी आप्पा स्मारक वसई किल्ला, पारनाका,निर्मळ,वाघोलीनाका,पढई-नाळे,आगाशी, बोळींज,उ मराळे, सोपारा, तुळींज, मनवेलपाडा,विरार,चंदनसार,शिरसाड असा दौरा त्यांनी पुर्ण केला.त्यानंतर ते दोन दिवसांच्या पालघर दौऱ्यावर निघून गेले.या दौऱ्यादरम्यान त्यांनी वाघोली ना्यावर छोटेखानी भाषण केले.

त्यात वसईतील गुंडगिरीबाबत त्यांनी वरील विधान केले.या परिसरातील गुंड मला माहित आहे.मला त्याचे नाव घ्यायचे नाही.ही गुंडगिरी कायमची मोडून काढण्यासाठी आपल्याला जिंकायचं आहे. आपण लढवय्ये सैनिक आहोत,आणि सैनिकासमोर उभं राहण्याची हिंम्मत गुंडात नसते.घरा-घरात जावून प्रचार करा की,इथल्या गुंडाला कडक शिक्षा करण्यासाठी धनुष्यबाणाला मतं द्या.आपण जिंकणारच आहोत.युती झाल्यामुळे समोरचा पक्षच शिल्लक राहिलेला नाही,त्यामुळे लढायचं कुणाशी असा प्रश्न निर्माण झाल्याचेही उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.गावित आपल्या पक्षात आले.त्यांचा अनुभव पाहता त्यांना उमेदवारी देणे स्वाभाविकच होते.असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सेना नेते एकनाथ शिंदे,भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण,आमदार राजेंद्र फाटक,उमेदवार राजेंद्र गावीत, जिल्हा समन्वयक श्रीनिवास वनगा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.विधानसभा समन्वयक हरिश्चंद्र पाटील यांनी या सभेचे आयोजन केले होते.

आपल्या या धावत्या दौऱ्याच उध्दव ठाकरे यांनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांची भेट घेतली.सर्वप्रथम त्यांनी अंबाडीरोड येथील गुरुद्वारा,त्यानंतर बाभोळा येथील बिशप हाऊस,वसई किल्ल्यातील चिमाजी आप्पा स्मारक आणि वसईतील दर्ग्यात जावून त्यांनी दर्शन घेतले.बिशप हाऊसमध्ये त्यांनी आर्च बिशप फेलीक्स मच्याडो यांचेही त्यांनी यावेळी आशिर्वाद घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!