वसईतील परदेशी अडकलेल्या सात हजार नाविकांना मायदेशी परत आणण्यास युनियनला यश

वसई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्तरावर बोटीने जल मार्गाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींवरील हजारो नाविक कर्मचाऱ्यांना सुरु असलेल्या कोरोना संसंर्गाच्या व सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अपेक्षेप्रमाणे  घरी परतता आले आहे.गेल्या पाच महिन्यातील या काळात या कर्मचाऱ्यांच्या युनियनने यासाठी प्रयत्न केले.

देश भरातील निरनिराळ्या बोटीवर सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांना परदेशी ते अडकून पडल्यावर सुखरुप मायदेशी आणण्यासाठी युनियनने ठोस कारवाई केली, तसेच वसई-विरार मधील ७००० हून अधिक नाविकांना जे देशभरातून या बोटीवर या काळात अडकले होते, अशा या नाविकांना ऑल इंडिया सिफेरर्स आणि जनरल वर्कर्स यूनियनतर्फे आपल्या मायभूमीला म्हणजे वसईला सुखरुप परत आणण्यास अखेर यश मिळाले आहे.

या युनियनचे कार्याध्यक्ष वसई तालुक्यातील रहिवाशी अभिजीत सांगळे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले  की, वास्तविक नोकरीच्या काळात गेल्या मार्च महिन्यापासून नौकेवर अडकलेले हे नाविक आम्हाला सुखरुप भारतात परत आणता आले. हे हजारो नाविक म्हणजे बोटीवरील कर्मचाऱ्यांना आपल्या मायभूमीकडे म्हणजे वसईला या कठीण काळात परतण्याची आस लागलेले युनियनचे सभासद होते. आपल्या गावच्या कुटुंबियांकडे येण्याच्या प्रतिक्षेत ते धडपडत होते, अशा वेळी आमच्या युनियनने केंद्रस सरकारकडून त्यासाठी आवश्यकत्या बाबींची पूर्तता करुन घेतली. जेव्हा ही परिस्थिती मला समजली तेव्हा शीपवर अडकलेल्या सदर नाविकांशी आम्ही संपर्क केला व त्यांची परतण्याची व्यवस्था युनियनमार्फत करण्यास धावपळ केली. प्रथम आम्ही केंद्र सरकारचे शिपींग मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय तसेच बोटीद्वारे जलवाहतूक करणाऱ्यां ज्या शिपींग कंपन्या होत्या त्यांच्या मॅनेजमेंटशी चर्चा केली. हे सर्व सोपस्कार करताना वेळोवेळी बोटीवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारतात परतण्यासाठी व्यवस्था करताना येणाऱ्यां अडचणींवर मात केली.तसेच सर्व शिपींग कंपनीच्या चार्टर्ड उडांणांची माहिती शिपींग मंत्रालय तसेच डीजी शिपींग कार्यालयाला वेळोवेळी देवून त्यांच्या परवानगीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखेर यश आले. या सर्व काळात आमच्या प्रयत्नामुळे बोटीवर अडकलेल्या नाविकांना स्वाभाविकच धीर मिळून आपण निश्चित परतू असा विश्वास त्यांना वाटत होता.

हे सर्व नाविक बोटीवर सेवेत असताना दिवसातील १५ ते १६ तास कामावर आपले लक्ष केंद्रित करुन त्यांचे युनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे हे सर्व सोपस्कार पार पाडीत होते. अखेर जसजशी या शिपींग कंपन्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून वंदे भारत मिशन अंतर्गत विमानाद्वारे मायदेशी परतण्याची सोय करण्यात आली होती. तसेच शिपींग कंपन्यांच्या चार्टर्ड उडाणांची परवानगी देखील वेळोवेळी मिळत गेली. तसतसे आजतागायत वसईतील नाविक भारतात परतण्यास सुरुवात झाली होती. आता अखेर ते सर्व परतले आहेत. ते भारतात आल्यावर महाराष्ट्रात राज्य सरकारने पॅसेंजर वाहक शिपींग कंपनी यांनी सर्व भारतात परतणाऱ्यांची कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सुरुवातीला विलगीकरण कक्षात ठेवण्याची सोय केली. त्यासाठी विविध हॉटेल्स आरक्षित करण्यात आली होती.

वास्तविक या नाविकांना भारतात परतण्याआधी बोटीवरच संसंर्ग होऊ नये म्हणून त्यांना त्यांच्या रुममध्येचविलगीकरण करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना फार कमी दिवस विमान प्रवासाने आल्यावर विलगीकरण कक्षात राहावे लागले.वसई-विरार येथील २०० नाविकांना विरार येथील विवा महाविद्यालयात परतल्यावर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.याकामी नालासोपारा विधान सभेचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यवस्था केली. अशा रितीने ७००० वसई-विरारकरांना त्यांचे विलगीकरण प्रक्रिया पूर्ण करुन आपापल्या घरी पाठविण्यात आले आहे. युनियनने यासाठी केलेले प्रयत्न व प्रशासनासहित सर्वांचे मिळालेले सहकार्य याबाबत अभिजीत सांगळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: