वसईतील यादव म्हात्रे खून खटला ; पोलीस अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार

वसई (वार्ताहर) : गेली 30 वर्षे गाजत असलेल्या वसईतील यादव म्हात्रे खून खटल्यात अंतीम टप्प्यात आला असून,या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवरच आता ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होणार आहेत.

वसईच्या पुर्व पट्टीतील कामण येथीस सामाजिक कार्यकर्ते यादव म्हात्रे यांची 29 जुन 1987 ला गोळया झाडून हत्या करण्यात आली होती.या गुन्ह्यात म्हात्रे यांचे बंधु गंगाधर म्हात्रे हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते.त्यांच्या साक्षेवरून सुरवातीला खऱ्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले होते.या विभागाचे पोलीस निरिक्षक सुदर्शन एरागुंठाराव आणि एस.एम.पिंपळकर यांनी खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी गणपत तुंबडा,त्याची मुले अशोक आणि दिलीप या आदिवासींना या प्रकरणात गोवले.

या तीघांना हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा यासाठी त्यांना पोलीस कोठडीत अमानुष मारहाणही करण्यात आली होती.त्यानंतर जामीनावर सुटल्यावर गणपत तुंबडा आणि अशोकचा मृत्यू झाला,तर दिलीपला कायमचे अपंगत्व आले.मात्र,गंगाधर म्हात्रे यांची साक्ष आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामुळे तीन्ही आदिवासींची 29 वर्षानंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.पोलीसांनी खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी या तिघांना गोवून त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य उध्वस्त केले.त्यामुळे संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा.आणि आदिवासी कुटुंबाला भरपाई मिळावी.अशी मागणी गंगाधर म्हात्रे,भूमी सेनेचे नेते काळुराम धोदडे,राजु पांढरा,विश्व मानव कल्याण परिषदेचे रामजी महेश्वरी संजोग यांनी अनुसूचीत जमातीच्या राष्ट्रीय आयोगाकडे केली होती.

त्यावर या आयोगाने सुनावणी घेताना संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई करण्यात यावी.नाहक गोवल्या गेलेल्या आदिवासींच्या कुटुंबांना पुरेशी भरपाई देण्यात यावी.स्वतःला निर्दोष सिध्द करण्यासाठी आदिवासींना स्वतःची मालमत्ता विकावी लागल्यामुळे पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच एकर जमीन त्यांना द्यावी.अशा शिङ्खारसी या आयोगाच्या सदस्या माया इनवटे यांनी शासनाकडे केल्या आहेत.या सुनावणीच्या वेळी कोकण विभागिय पोलीस अधिक्षक के.व्ही.निजाई,वसईचे तहसिलदार वाय.सी.पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!