वसईत औषध आणि धूर फवारणीचा दर्जा तपासण्याची गरज – किरण चेंदवनकर

वसई (वार्ताहर) : वसई-विरार महापालिका क्षेत्रात डेंग्यू व मलेरियाच्या आजाराने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत चालला असून शहरातील रुग्णालये रुग्णांनी भरगच्च भरली आहेत. त्यामुळे एकीकडे आरोग्य विभागाकडून कोट्यवधी रुपयांची कीटकनाशके व औषध खरेदी करून शहरात फवारणी केली जात असताना देखील रुग्णांचा आकडा का वाढतोय? असा प्रश्न शिवसेना नगरसेवक, तथा गटनेत्या सौ किरण चेंदवनकर यांनी लेखी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना दिले आहे.
किरण चेंदवनकर यांनी दिलेल्या निवेदनात, शहरातील सरासरी दर दहा कुटुंबीयांतील एका कुटुंबामध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळत असल्याचे वास्तक आहे. तसेच दररोज डेंग्यू व मलेरीयाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे एकीकडे मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेला हे अशोभनीय असल्याचे त्यांनी म्हटलेय.
शहरातील खाजगी क्लिनिक मधल्या चाचण्या सर्व सामान्यांना परवडत नसल्याने शहरातील पालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रामध्ये रुग्णाची तपासणी केली असता डेंग्यू रुग्ण वाढण्याच्या संख्येत आळा घालता येईल, अशी मागणी किरण चेंदवनकर यांनी केली.
तसेच शहरात जी महानगरपालिकेकडून औषध फवारणी व धूर फवारणी केली जात आहे. त्यामुळे शहरातील रोगराई नियंत्रणात येत नाही. त्यामुळे या औषधाचा दर्जा तपासण्याची गरज असल्याचे चेंदवनकर यांनी पत्रात म्हटलेय.
रुग्णाचा आकडा
वसई-विरार शहरात डेंग्यू व मलेरियाने नाक वर काढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होता आहे. या माहापालीकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ११४ संशयित डेंग्यू तर मलेरियाचे ५० रुग्ण आढळून आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!