वसईत जागतिक अपंग दिवस साजरा

वसई (वार्ताहर) : अपंग व्यक्तीबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो. अपंगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा म्हणून अनेक संस्था काम करतात. अपंग व अपंग संस्थांना सन्मानित करण्यासाठी मंगळवार दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळी आर्यन चॅरिटेबल ट्रस्ट , लायन्स क्लब ऑफ वसई युनिक, सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट आणि किंजल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकसेवा मंडळ, बंगली, वसई येथे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी अपंग मित्राने दोन फिल्मी गीत गायले. नृत्याविष्कार कला-क्रीडा मंडळ यांनी लोकनृत्य सादर केली. फा.बाप्टिस्ट लोपीस (उमेद-अपंग संस्था) आणि मा.सिंथीया बाप्टिस्टा (अपंग सेवा संस्था) यांच्या विशेष सत्काराचे नियोजिन होते. परंतु त्यांनी तो सन्मान आपल्या संस्थेतील एका अपंगाला दिला. समाजापुढे एका मोठा आदर्श ठेवला. श्री.शम्स पठाण व श्री.शाहिद शेख (मुन्नाभाई) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. अपंगांचा आपण सन्मान केला पाहिजे असा पाहुण्यांनी भाषणातून संदेश दिला. श्री.अजय पाटील यांनी अपंगांच्या पुढे आपण अपंग आहोत असा विचार मांडला. श्री.सुरेश काळे (लायन्स) सौ. लिला परेरा (रुग्ण-मैत्रीण) यांची देखील सेवाभावी मंचवर सोबत मिळाली.
सौ.एरीना परेरा यांनी अपंग व अपंग संस्थासोबत काम करण्याची तयारी असल्याचे सांगितले. श्री. संदेश काळोखे यांनी आयोजन यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. सूत्र-संचलनाची जबाबदारी श्री. सुनिल अनुसे यांनी पार पाडली.
लेझीमच्या तालावर अपंगांचे स्वागत करण्यात आले.भक्तीगीत गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित प्रेषकांच्या आग्रहामुळे अपंगांनी देखील लेझीमच्या तालावर नृत्य करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर स्वतःहून  ‘शांताबाय’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य केले. त्यांचे हास्य,आनंद व नाचण्यासाठी करत असलेला प्रयत्नांनी प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले.    अपंगांच्या चेहऱ्यावरील स्मित-हास्य घेऊन राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: