वसईत प्रथमच एरोमॉडेलिंग शो

वसई : संजीवनी परिवार वसई ने दिनांक २६  मे २०१९ रोजी सकाळी ८ ते ११ दरम्यात एरोमॉडेलिंग शोचं दोन भागात आयोजन केलं आहे. पहिल्या भागात विध्यार्थ्यांना सकाळी ८ ते ९ वा दरम्यान सेट जोसेफ महाविद्यालय सभागृहात विमान शास्रा अंतर्गत विमानाचा शोध कसा लागला, विमान उडते कसे, विमान हवेत तरंगते कसे,त्यामागचे विज्ञान काय इत्यादी कुतूहल  वउत्सुकता वर्धक प्रश्नाची उत्तरे मिळतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नाव नोंदवणे आवश्यक. दुसऱ्या भागात सकाळी ९:३० वाजता सेंट जोसेफ महाविद्यालय राजोडी जवळील मामावांती क्रीडा मंडळ मैदान सत्पाळा येथे आकषर्क व थरारक प्रात्यक्षिकं करण्यात येतील या अत्तर्गत लहान-मोठया व विविध प्रकारच्या इले, मोटर व इंजिनवर उडणाऱ्या रेडिओ कंट्रोलने नियंत्रित करता येणाऱ्या आकर्षक मॉडेल्सची प्रात्यक्षिके व हवाई कसरती दाखविल्या जातील. तसेच, ट्रेनर विमान, पक्ष्याप्रमाणे हवेत तरंगणारी ग्लायडर उडती तबकडी, बॅनर टोइंग, हवाई पुष्पवृष्टी याशिवाय लढाऊ विमानाच्या थरारक कसरती पहायला मिळणार आहेत.

संजीवनी परिवाराने नुकताच रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं केलं,त्यानिमित्ताने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सुट्टी मध्ये नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचं आयोजन केलं आहे. लिटिल विग्स इंडियाचे संचालक श्री सदानंद काळे यांच्या मार्गदर्शना खाली हा शो होणार आहे. या शो मध्ये भाग घेण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी आपली नावेनोंदवावीत व निराशा टाळावी.

नाव नोंदणीसाठी संपर्क :  1).विलास नाईक 9561696352,. 2)अरविंद पाटील 9423908625,.  3) आनंद पाटील  9022600582.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!