वसईत बनवले जाताहेत अत्यावश्यक सेवेचे बनावट पासेस ?

वसई (वार्ताहर) : संचारबंदीच्या काळात वसईत मुक्त वावर करण्यासाठी वसईत अत्यावश्यक सेवेचे बनावट पासेस बनवण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचारबंदीत फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना दळणवळणासाठी महाराष्ट्र पोलीसांकडून ई पासेस ऑनलाईन देण्यात आले आहेत. या पासेसचा
्युआरकोड असलेले प्रींट अत्यावश्यक वाहनांवर लावण्यात येते. ही कोड पाहून पोलीस वाहने अडवत नाहीत. याचा गैरफायदा घेवून काही लोग बनवट पासेस लावून गाडया फिरवत असल्याची माहिती नालासोपारातील गोपनीय पोलीसांना मिळाली
होती. त्यानुसार सोपाराती चक्रेश्वर तलावाजवळील एका तरुणाला ताब्यात घेवून त्यांनी त्याच्या गाडीवरील कोड तपासला असता, तो नायगांव येथील सचिन दिलीप  तायडे याच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले. या सचिनला ताब्या घेतल्यावर अत्यावश्यक सेवेचे बनावट पासेस तयार करण्यात असल्याची माहिती नालासोपारातील गोपनीय पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोपाराती चक्रेश्वर तलावाजवळील एका तरुणाला ताब्यात घेवून
त्यांनी त्याच्या गाडीवरील कोड तपासला असता.तो नायगांव येथील सचिन दिलीप तायडे याच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले. तायडेने स्वतःच्या नावे पास काढला आणि या पासेसमध्ये फेरबदल करून त्याने नालासोपारातील काही जणांना दिल्याचे कबूल
केले.

याबनावट पासेससाठी महाराष्ट्र पोलीसांच्या बोधचिन्हाचाही वापर करण्यात आला आहे.त्यामुळे सचिनवर ४६५ आणि ४८४ कलमान्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!