वसईत सहा वर्षीय बालिकेवर फेरीवाल्याचा अत्याचार

वसई (वार्ताहर) : वसईच्या पुर्वेकडील सहा वर्षीय बालिकेवर एका फरवाल्याने अत्याचार केल्याची घटना उघडकिस आली आहे.

तुंगारफाटा येथे चप्पल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या इसमाची सहा वर्षीय मुलगी चॉकलेट विकत घेवून त्यांच्या दुकानाकडे निघाली होती.त्यावेळी फळ विक्री करणाऱ्या रईसुल खान याच्याशी तिची गाठ पडली. त्याने केली आणि आंबे देण्याचे आमिष दाखवून तिला एका दुकानाच्या गाळयात नेले.तीथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.तीने आरडाओरडा करून कशीबशी आपली सुटका करून घेतली. त्यानंतर घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. या प्रकरणाची तिच्या पालंकानी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार केली असून,आरोपी खान याच्या विरोधात कलम 354 ब, 509 आणि बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!