वसईमध्ये नवीन पासपोर्ट कार्यालय लवकरच कार्यन्वित होणार

वसई : वसई-विरार मधील पारपत्र (पासपोर्ट) काढू इच्छिणारे  तसेच नूतनीकरण करणाऱयांसाठी आनंदाची तसेच दिलासा देणारी बातमी. केंद्र सरकारच्या योजनेनुसार वसई मध्ये नवीन पारपत्र कार्यालय  (पासपोर्ट ऑफिस) लवकरात लवकर  कार्यन्वित करण्याच्या सूचना परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी संबंधित अधिकारयांना दिल्या. पालघरचे खासदार श्री. राजेंद्र गावित यांनी गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्र्याची भेट घेऊन त्यांना या संबधी लेखी निवेदन सादर केले. पालघर जिल्हा नव्याने निर्माण झाला आहे तसेच वसई-विरार मधील शहरी भागातील लोकसंख्या जवळपास २२ लाखाहून अधिक झाली आहे  आणि त्यामुळे पारपत्र काढणाऱ्या नागरिकांची  संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी  मुंबई अथवा ठाणे  हा जवळचा  पर्याय आहे  या दोन्ही ठिकाणांसाठी  लागणारा वेळ तसेच प्रवास आणि होणारा त्रास या संबधी  माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी परराष्ट्र मंत्र्यांना दिली.

या सर्वांचा विचार करून लवकरात लवकर  पारपत्र कार्यालय सुरु करण्यासाठी श्रीमती स्वराज यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन कार्यवाही करण्याचे सुचवले, लवकरच वसईमध्ये योग्य जागा शोधून पारपत्र कार्यालय सुरु होईल अशी माहिती खासदार गावित यांनी दिली.
3 comments to “वसईमध्ये नवीन पासपोर्ट कार्यालय लवकरच कार्यन्वित होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!