वसईमध्ये प्रथमतः मिसळ महोत्सवाचे आयोजन

वसई : शिवसेना नवघर माणिकपूर शहर आणि आराध्य फौंडेशनच्या माध्यमातून वसईमध्ये प्रथमतः मिसळ महोत्सवाचे आयोजन पार्वती सिनेमा मैदान, अंबाडी रोड ,वसई पश्चिम येथे दि. ११ जानेवारी ते १३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९ ते रात्री १० या वेळात आयोजित करण्यात येणार आहे.
शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात वसईच्या खवय्यांना बंबातली मिसळ,माठातली मिसळ, पुणे कोल्हापूरची झकास मिसळ,पारनेरची झटकेदार मिसळ, नाशिकची मूग मटकी मिसळ, ठाण्याची मामलेदार मिसळ, नांदेडची मिसळ, कणकवलीची मिसळ वडे, कोल्हापूरच्या मिसळीबरोबर दांडगा पैलवान कट वडा असे ५०/६० स्वादांच्या, वेगवेगळ्या चवींच्या मिसळ खाण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे
मिसळ म्हणजे महाराष्ट्राची अस्सल चव. म्हणूनच या मिसळ महोत्सवात काळ्या रस्श्याची चमचमीत मिसळ, तांबड्या रस्श्याची झणझणीत मिसळ पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, हिरव्या रस्श्याची मस्त मिसळ तुमच दिल खुश करेल, चुलीवरची गावरान मिसळ म्हणजे खवय्याना पर्वणीच, पांढर्या रस्श्याची मिसळ, जैन मिसळ, झणझणीत, चमचमीत, चटकदार, झटका मिसळ, अनेक चवींची अन अनेक स्वादांची मस्त मिसळ फस्त करायाला आपल्या मिसळ महोत्सवात नाशिक पासून नगर पर्यंत,पुण्या पासून कोल्हापूर पर्यंत, कणकवली पासून ठाण्यापर्यंत इतर अनेक ठिकाणच्या चमचमीत मिसळ खाण्याची सुवर्णसंधी प्राप्त करून देत आहेत.
तिखट खाल्यानंतर छान गोड व थंड पदार्थ देखील या आपल्या मिसळ महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
१) गुरुचे मोकटेल्स २) औरंगाबादच्या साबिर भाई चे पान ३) पनवेलचे खरवस ४) पुण्यातला सुप्रसिद्ध बर्फाचा गोळा ५) फ्रूट सलाड आणि बरच काही….२०१८ मध्ये झालेल्या परळ, दादर, लालबाग,ठाणे मधील मिसळ महोत्सवात ५०,००० हजार खवय्यांनी मिसळ महोत्सवास भेट दिली व वेगवेगळ्या मिसळीची चव चाखली. २०१९ च्या सुरुवातीलाच विरार मधल्या मिसळ महोत्सवात १८००० विरारच्या खाद्यप्रेमींना हजेरी लावली.
या मिसळ महोत्सवात गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स देखील असून येथे महिलांना साड्या, मसाले, कटलरी, ज्वेलरी, व इतर अनेक गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करता येईल.
संपूर्ण कुटुंबाने, मित्रमंडळी व नातेवाईकांनी एकत्रित सहभागी होऊन खाण्यापिण्याचा आनंद घेता येईल असा एक आगळा वेगळा तर्रीदार आनंदोत्सव म्हणजे मिसळ महोत्सव.
मिसळ म्हणजे महाराष्ट्राची अस्सल चव. या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!