वसई का बुडाली ?

जुलै महिन्यात वसईमध्ये पूर आला त्या पुराच्या अनुषंगाने वसईचे आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी वसई का बुडाली ? या विरोधकांच्या आरोपाला उत्तर म्हणून एका व्यासपीठावर या असे आवाहन केले त्याला शिवसेनेने प्रतिसाद दिला आणि आयुक्त व तहसीलदार आणि जमले तर पालघरचे खासदार श्री राजेंद्रजी गावित यांनी देखील या व्यासपीठावर यावे असे सांगितले.
दोन महिने झाले पण या दृष्टीने पाऊल उचलले गेले नाही. आता २ ऑक्टोबर ला परिसंवाद आयोजित करण्यात आला “वसई पुन्हा बुडू नये म्हणून ” परंतु वसई का बुडाली ? असा विषय असता तर वसई न बुडण्याची कारणे समोर आली असती.
दोन वर्षांपूर्वी वसईमध्ये पूर येऊ शकतो असे सांगूनही तहसीलदार आणि आयुक्त यांनी अनधिकृत पुलावर जिल्हाधिकारी व सॉल्ट विभाग यांनी अनधिकृत पूल तोडा असे आदेश देवूनही कारवाई न करणाऱ्या तहसीलदार आणि आयुक्तांना या व्यासपीठावर का नाही बोलावले त्या मागचे गुपित हा परिसंवाद आयोजित करणार्यांना माहीत . महापौर श्री रुपेश जाधव यांनी देखील औद्योगिक क्षेत्रात जे १५० कोटीचे नुकसान झाले त्यामागे हा पूल आहे त्याचबरोबर वनक्षेत्र , सॉल्ट जमीन यावर झालेली अनधिकृत बांधकामं ही देखील कारणे आहेत असे नमूद केले. महापौरांना या परिसंवादमध्ये का नाही बोलवत ते कळत नाही जर ते आले तर अशा अनधिकृत बांधकामामागे कोण विकासक आहेत ते कळेल.
वसई पुराच्या निमित्ताने पूल कोणी बांधला ?तहसीलदार / आयुक्त यांनी या पुलावर कारवाई का नाही केली ? नैसर्गिक नाले , खाड्या यावर कोणी अनधिकृत बांधकाम केले ? सत्यशोधन समितीचा बनाव का केला ? जिल्हाधिकारी आणि सॉल्ट विभाग यांचे आदेश का नाही पाळले ? नेमका पंचनाम्यानुसार नुकसानभरपाईचा आकडा किती ? नुकसानभरपाई किती दिली गेली, जे धनादेश आस्थापनाचे काढले ते परत घेतले त्याचा आकडा नेमका किती ? ५ बळी गेले , हजारो कोटीचे नुकसान झाले आणि लाखो लोकांचे स्वप्न उद्धवस्त झाली त्यांना मोकाट सोडणार का ? असे असंख्य प्रश्न समोर असताना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगरसेवकानी केरळला आर्थिक मदत दिली त्याबद्दल आक्षेप नाही, पण ज्या वसईकरांच्या करातून आपण मदत दिली त्या वसईकरांना वाऱ्यावर सोडले आणि वसईच्या जनतेला गृहीत धरले आहे. या पुराच्या जखमा अजूनही सुकल्या नाहीत तोच त्यावर मीठ चोळण्याचा अतिशय प्रकार अतिशय निंदनीय आहे.
वसई शिवसेनेकडून अशा असंवेदनशील महानगरपालिकेला जागे करण्यासाठी या पितृ पंधरवड्यात या अतृप्त आत्म्यांना शांती मिळावी म्हणून श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित रहावे.

मिलिंद चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: