वसई खाडी ते उल्हास नदीतील प्रवासी रो-री फेरी सुरु करण्यासाठी जल वाहतूक विकास मंत्रालयाचे आश्वासन

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी जल वाहतूक व रस्ते बांधकाम केंद्रयमंत्री नितीन गडकरी यांची मुंबईत तर त्यांचे सचिव सुदीप दत्त यांची दिल्लीत भेट घेवून त्यांना री-रो फेरी,रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज व पालघर ते मुंबई कोस्टल कॉरीडोरसाठी निवेदन दिले.

ठाणे ते भाईंदर व वसई या रो-रो सेवेला या आधीच मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे नवघर पूर्व वसई खाडी ते उल्हास नदी या दरम्यान रो-रो फेरी सुरु केल्यास नायगाव, जूचंद्र,मालजीपाडा, सासुनावघा, राजवली, टीवरी, ठाणे, कल्याण येथील 17 लाख नागरिकांना या सेवेचा लाभ मिळेल. वसई-विरार शहर हे मुख्य शहर आहे. वसई पूर्वीच्या खाडीला शहराचा बराचसा भाग जोडलेला आहे. सदर खाडी ही 21मीटर रुंदीची असून, सदर खाडी 40 मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव आहे. त्या खाडीवरील रो-रो फेरी सुरु झाल्यास पूर्वेकडील 50 हजार नागरिक मुंबई व ठाण्यासारख्या शहरात जा-ये करण्यास सुखकर होईल. तसेच रो-रो फेरी सुरूं झाल्यास वसई-विरार शहरामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ होवून, पर्यटनमुळे रोजगार ही वाढेल व प्रदूषणाला ही काही प्रमाणात आला बसेल.

पालघर, वसई विरार ते मुंबई हा समुद्रीमार्ग सुरु झाल्यास गुजरात व मुंबईकडे जाणारी वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावरून कमी होवून वेळ ही कमी लागेल. समुद्रीमार्गाचा रास्ता हा टेम्बेखेडावे (पालघर) म्हाराम्बपाडा (वसई) ते मुंबई असा असेल. त्यामुळे पालघर, वसई-विरार वरून मुंबईकडे जाणारे चाकरमानी या मार्गाने सोयीस्कररीत्या प्रवास करून आपला अमूल्य वेळ वाचवू शकतील.

गुजरात ते बोराडी हा रास्ता पूर्ण असून मुंबई ते भाईंदर हा रास्ता प्रास्तविक आहे. नायगाव भाईंदर खाडीवरील ब्रिजची निविदा निघाली असून लवकरात लवकर काम चालू होईल.

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नारंगी, कोपरी,ओसवाल नागरी, अलंकापुरी आणि उमेळमान येथे रेल्वे जोडून पूर्व पश्चिम फ्लायओव्हर ब्रिजच्या कामाचे निवेदन देण्यात आले.

रेल्वे, वसईतील उड्डाणपूल, रो-रो सेवा, कोस्टल रोड,मिठागर वस्तीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या या सर्वांची निवेदने सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना प्रताय्क्ष भेटून महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी दिले, यावेळी संबंधित विभागाच्या मंत्रांना निवेदने देवून या बाबत पाठपुरावा करण्याचे अश्वशन रामदास आठवले यांनी दिले.

नवघर पूर्वेकडील मिठानगर वस्तीतील नागरिकांना सुविधा मिळवी. सॉल्ट विभागाच्या सचिवांना साकडे.

वसई नवघर पावसाळयात मिठानगर वस्तीत पाणी साचते, यामुळे येथील कुटुंबांच्या संपर्क तुटत असतो. यावेळी पालिका प्रशासन त्यांना मदत करत असते. मात्र सॉल्ट विभागाची जागा असल्याने या ठिकाणी रस्ते व इतर कामे करण्याच्या अडचणी निर्माण होतात. या ठिकाणी पावसाळयात पाणी साचल्याने वसई-विरार महानगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला रेस्क्यू करून कुटुंबांना अन्यत्र स्थलांतरित करण्याची वेळ येत असते. तसेच मालमत्तेचे नुकसान होते. गरोदर महिला,लहान मुले, अपंग, ज्येष्ठ नागरिक आदींनी त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. पर्जन्य परिस्थिती नंतरही संसाराची घडी बसविण्यासाठी वेळ लागतो. ही वस्ती सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी अवजड उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांची मुंबई येथे भेट घेतली तर त्यांचे सचिव सौरभ गौर (भा.प्र.से), राजीव कंडपाल (डायरेक्टर) तर खाजगी सचिव अमित भोळे यांची दिल्लीत भेट घेउन त्यांना वसई नवघर पूर्वीकडे मिठानगर वस्ती विकासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी साकडे घेतले. तर पाणजू व भाईंदर हा 1325कोटींचा ब्रिज होणार असला तरी मात्र सॉल्ट विभागाच्या जमिनी या बाधित होणार आहेत. याबाबत महानगर क्षेत्र विकास करावा असे सांगितले. वरील सॉल्टच्या जमिनीचा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने सॉल्ट विभागाला दिल्ली येथे पाठविला आहे. तसेच पर्यावरण विभागाचे उपसचिव डॉ.गौरीशंकर यांची भेट घेवून म्हजपालिकेच्या विकास कामात सि.आर.झेड, वन विभाग व वेटलँड अश्या नेहमीच अडचणी येत असतात. त्याबाबतीत वसई-विरार शहर महानगरपालिका प्रस्ताव करून पाठवावावं त्यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन डॉ.गौरीशंकर यांनी दिले.

वसई महिला विशेष लोकल पुन्हा सुरु करण्याची मागणी

वसई-विरार शहर महानगरपालिका महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची मुंबईत व रेल्वे राज्यमंत्री मनोज सिंह व गोयल यांचे सचिव प्रवीण गोडाम (भा.प्र.से) यांची दिल्लीत भेट घेवून त्यांना वसई ते चर्चगेट महिला लोकल पुन्हा सुरु करण्याची मागणी केली.

वसई रेल्वे 9.56 सुटणारी महिला विशेष लोकल बंद केल्याने महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत मात्र रेल्वेने आद्याप उपयोजना न खेम्याने ज्येष्ठ महिला, रुग्ण यांच्यासह मुंबईला जाणाऱ्या चाकरमानी महिलांना गौरसोयीला सामोरे जावे लागते. ही सेवा पूर्ववत सुरु करून महिला प्रवाश्याना दिलासा द्यावा अशी मागणी वसईचे आम. हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वसई-विरार शहर महानगरपालिका महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी रेल्वेमंत्रीकडे केली असून याबाबत सकारात्मक निर्णय देण्यात येईल. असे अश्वशन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले.

तसेच वसई-अंबाडी रोड येथील पूर्व-पश्चिम रेल्वे ब्रिज जुलै महिन्यापासून बंद असून त्याबाबतचे निवेदन मुंबईत रेल्वे मंत्री पियुश गोयल यांना आम. हितेंद्र ठाकूर, आम.क्षितिज ठाकूर व महापौर रुपेश जाधव यांनी दिले होते. रेल्वे ब्रिज बंद असल्याने वाहनचालक, चाकरमानी, कारखानदार यांचे फारच हाल होत आहेत. वसई पूर्वेला त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या बाबतचे निवेदन दिल्ली येथे महापौर रुपेश जाधव व माजी महापूर नारायण मानकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!