वसई तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षक संख्या कमी ; तरी पण शिक्षकांंची ऑनलाईन ट्रान्सफर

वसई (वार्ताहर) : महाराष्ट्र शासन शिक्षणाबाबत गंभीर आहे की मुलकांना चांगले शिक्षण मिळावे. सध्याची परिस्थिती जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या शाळा कमी होत आहे,  काही बंद पडत आहे, ह्याचे महत्वाचे कारण पालकांचे खाजगी शाळांकडे जास्त लक्ष आहे. खजी शाळा विश्वस्त मार्फत चालतात व येथील शिक्षणाची बदली होत नाही. शिक्षकांचे घर शाळेच्या ५ किलो मीटर अंतरावर असते. त्यामुळे शिक्षक मुलांचा शिक्षणावर जास्त लक्ष देतात.

जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ७ वी वर्ग असतात. विद्यार्थी ८ वी कक्षासाठी हाय-स्कूल मध्ये दाखल होतात. १0वी मध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. जिल्हा परिषद शाळेत गरीब कुटुंबातील विद्यार्थी अधिक असतात, घरात अभ्यासपूर्वक वातावरणाची कामी असते तरी पण जिल्हा परिषदेतील शिक्षक अत्यंत मेहनतीने व चिकाटीने त्यांचा अभ्यासावर लक्ष देतात. महाराष्ट्र शासनाने ह्या वर्षी शिक्षकांच्या बदलीसाठी ऑॅनलाईन प्रक्रिया चालू केली आहे. विरार, नालासोपारा, वसई येथील शिक्षकांची वाडा, मनोर, पालघर व इतर ठिकाणी बदली केली आहे. शासनाचा हा कोणता धोरण आहे ?

विरार ते पालघर जाण्याचा एकतरफी प्रवास डीढ ते दोन तास आहे. तसेच पालघर ते वाडा व मनोर जाण्याचा प्रवास हा सुध्दा एक ते डीढ तासाचा असून बसाने जावे लागतात. सकाळच्या वेळी गाडीत गर्दी भरपूर असते. शिक्षकांना बसायला जागा पण मिळत नाही. चार पाच तास प्रवासात जाणार. त्यामुळे शिक्षकांना मानसिक व शारिरीक त्रास होणार तर ते मुलांना कशा प्रकारे शिकवतील ?

वसई तालुक्यात उर्दू शाळेत २२ शिक्षकांची कमी आहे. पेल्हार शाळेत शिक्षक नाही. मागील दोन वर्षात ८ ते ९ वी वर्ग सुरु केला आहे. पुढच्या वर्षात १०वी ची वर्ग सुरु होणार, ह्या मुलांना गणित व विज्ञान शिकवण्यासाठी शिक्षक नाही.

१) शिक्षकांचा विरुध्द मुख्याध्यापक, शाळा समिती किंवा पालकांची तक्रार असेल तर त्यांची बदली करावी.

२) काही शिक्षकांना बदलीची गरज असते पण आपण त्यांची बदली करत नाहीत.

३) जर कुठला शिक्षक कोणत्या शाळेत जास्त वर्षपासून चांगला शिकवत असेल तर त्यांची बदली का ?.

४)शालेय व्यवस्थापन समितीची सल्ला घेणे सुध्दा आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!