वसई तालुक्यातील ३३ जणांवर हद्दपारीची कारवाई

वसई (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष आणि नगरसेविकेच्या मुलासह वसई तालु्यातील ३३ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिये दरम्यान त्यांना वसई तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा आमदार आनंदभाई ठाकुर यांचे विश्वासु सहकारी गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर आणि बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित शाम पेंढारी यांच्यासह 33 जणांवर हद्दपारीची कारवाई उपविभागिय दंडाधिकाऱ्यांनी केली आहे.तुळींज, नालासोपारा,माणिकपुर,वालीव,विरार,वसई पोलीस ठाण्याच्या हद्दितील हे गुन्हेगार आहेत.

मोन्टू उर्फ थापा चौधरी, मनोज गुलाब सिंग, राजेश विजयशंकर यादव,प्रिन्स उर्फ निलेश रमेश सिंग, पवन अभिमन्यु सिंग,प्रथमेश शिवराव पवार,जावेद रफिक अन्सारी या सात जणांना एक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर गोविंदा गुंजाळकर,अमित पेंढारी यांच्यासह सचिन थोरात, गौरव उर्फ विकास किणी, कौशिक गावड,शनी वाघरी उर्फ मल,बालाजी फड, उस्मान पटेल, महेश कुडू, संजय बिहारी उर्फ संजय महंतो, अजय पांडे, बद्रीआलम आकलाक चौधरी, अंकित उर्फ बंटी यादव, रवि आगिवले, डुंगाम पटेल, रुपेश डिमेलो, चंद्रकांत लोखंडे,बाबर उर्फ बाबा खान, इत्तेशाम अन्सारी, पवन सिंग, ऋषीकुमार सिंग,वामन किणी, उदय जाधव,सलीम सरदार,रशिद सय्यद आणि संजय महंतो यांना १८ एप्रिल ते २ मे आणि २२ ते २४ मे या कालावधीत वसई तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!