वसई न्यायालयात सोयी सुविधा तातडीने पुरविण्यात यावी – शिव विधी सेना

वसई (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका मधे गाव मौजे मालाेंडे येथे वसई दिवाणी व फौजदारी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सनं १९५७ पासून अस्तित्वात आह.  वसई दिवाणी व फौजदारी न्यायालय (वरिष्ठ  स्तर) वसई जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय सन २००७ पासून अस्तित्वात आला असून एकूण १० न्यायालय कार्यन्वीत आहेत. वसई न्यायालयात एकूण तीन एस्टॅब्लिशमेंट असून एकूण दहा न्यायालयाची विभागणी वेगवेगळया स्तरावर झाली आहे. तर मागील अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या न्यायालयाचे दुरुस्तीचे काम प्रलंबित आहे. प्रलंबित कामे पुढील प्रमाणे…

१) वसई दिवाणी व फौजदारी (कनिष्ठ स्तर) न्यायालयाचे दोन न्याअसनाचे बांधकाम करणे

२) वसई दिवाणी व फौजदारी न्यायालय दुरुस्ती करणे व देखभाल करणे

३) वसई येथे न्यायाधीशांची ”निवास स्थानांची” दुरुस्ती करणे

४) वसई न्यायालय साठी जनरेटर साठी डिझेल पुरवठा करणे

५) वसई न्यायालयात सोलर पॅनल लावणे

६) वसई न्यायालयात एडमिनिस्ट्रेटर ऑॅफिसचे बांधकाम होणे, आरोपींना सुरक्षित ठेवण्यासाठी तुरुंग,पोलिस कर्मचाऱ्यांना कामासाठी स्वतंत्र खोलीचे  बांधकाम होणे तसेच निकाली खटले सुनियोजित  ठेवण्यासाठी रेकॉर्ड रुमचे बांधकाम होणे.

वसई न्यायालयात एकूण स्त्री व पुरुष असे दहा शौचालय अस्तित्वात आहे. सदर शौचालय ही वापरण्यापलोकडे झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे व किमान तीन कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त करणे. तसेच न्यायालयामध्ये घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून अनेक वकील व कर्मचारी यांना डेंगू मलेरिया चे लक्षण झालेले आहे.

वसई न्यायालय ची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. वसई न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता नियुक्त न्यायालयाची संख्या कमी आहे. ज्याचा ताण वसई तालुक्यातील जनसंख्या, पक्षकार, वकील व न्यायाधीश आणि कर्मचारी वृंद संख्या फार मोठयाप्रमाणात होत आहे. मागील अनेक वर्षांपासून वरील मागणीकडे नियमित दुर्लक्ष व दिरंगाई होत आली आहे, ज्याचा परिणाम दैनिक न्यायालयाने कामकाजावर होत आहे. म्हणून सदरची मागणी जिल्हा नियोजनामध्ये मंजूर करून सोयी सुविधा तातडीने पुरविण्यात यावी अशी मागणी शिव विधी सेना (वसई तालूका) मार्फत पालक मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: