वसई प्रगती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तर्फे धर्मादाय निधी वाटप समारंभ संपन्न

वसई : वसई प्रगती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड,अर्नाळा या वसई तालुक्यातील अग्रेसर पतसंस्थेचा धर्मादाय निधी वाटप समारंभ, रविवार दि.९ जून २१९ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते पार पडला. सदर समारंभास आगरी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष मदन किणी, आगरी समाजाचे ज्येष्ठ  नेते  व माजी महापौर नारायण मानकर, अर्नाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच,सौ.हेमलता बाळशी, देवराम पाटील  सदस्य, जिल्हा परिषद पालघर) तसेच रमेश लखमा वझे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती),आगरी समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष, भरत भोईर इ. मान्यवर उपस्थित होते.

या समारंभातून संस्थेच्या आधिमंडळाच्या २६ व्या वर्षिक बैठकीतील निर्णयानुसार शैक्षणिक तसेच सामजिक संस्थांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना संस्थेच्या मंजूर धर्मादाय निधारुचे वाटप करण्यांत आले. आगरी समाज विकास शिक्षण संस्था, वसई यांना ई-लर्नींग प्रकल्पासाठी रु.२५,००,०००/- तसेच गतवर्षात अर्नाळा येथे झालेल्या चक्रीवादलात आपतग्रस्त झालेल्या १२५ नागरिकांना एकूण रु.५,००,०००/-  इतक्या आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटप करण्यांत आले. संस्थेन यापूर्वी केरळ येथे झालेल्या आतिवृष्टीमुळे आपतग्रस्त झालेल्या नागरिकांसाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीस  रु.३,००,०००/-आर्थिक मदत दिलेली होती.

कार्यक्रमाचे प्रमुख आतिथी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी प्रगती पतसंस्थेने जातीपातीचे राजकारण न पाहता परिसरातील सर्व आपतग्रस्तांना मदतीचा हात दिला ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. पतसंस्थेने आधिक बळकटीसाठी पत पाहून पतपुरवठा करावा तसेच शाखा विस्तार करावा अशी सूचना केली. संस्थांच्या बळकटीसाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेणे गरजेचे असून”मतभेद” झाले तरी चालतील पण ”मनभेद” होऊ  नये अशी भावना व्यक्त केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना लवकरात लवकर मार्केटसाठी  जागा संपादन करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे आवाहन केले.

तालुक्यातील मोठया बँका तसेच पतसंस्थानाही करता न आलेले सामजिक उपक्रम आपली संस्था सातत्याने राबवीत आहे हे संस्थेचे कार्य नक्कीच आभिनंदनास पात्र असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी नमूद केले. आपतग्रस्तांना मदत करणारी ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात एकमेकद्वितीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकऱ्यांसाठी शासन राबवीत असलेल्या अनेक योजनांची महिती दिली. सर्व लोकप्रतिनिधींना या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले व त्यासाठी  लागणारी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले. अर्नाळा येथील फुलविक्रेते मुंबईला फुले नेऊन विकत असल्याने जादा खर्च व भाडे तसे कमीशन द्यवे लागत असल्याने सर्व फुल-शेतकऱ्यांनी मिळून मुंबईत फुलबाजाराच्या ठिकाणी गाला खरेदी करण्याबाबत विचार करावा असे नमूद केले.

आगरी समाज विकास मंडलाचे अध्यक्ष मदन किणी यांनी वसई प्रगती पतसंस्था करीत असलेल्या सर्व प्रकारच्या सामजिक कार्याबद्दल त्यांचे आभिनंदन केले. अर्नाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता बाळशी, जिल्हा परिषद सदस्य  देवराम पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश वझे यांनी संस्था करीत असलेल्या सामजिक कार्याचा गौरव केला व संस्था करीत असलेल्या उत्तम कामकाजामुळे आपली पतसंस्था तालुक्यामध्ये अग्रगण्य असल्याचे मत व्यक्त केले.

वसई प्रगतीचे अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत तसेच संस्था आयोजित करीत असलेल्या विविध मार्गदर्शन/आरोग्य/योग शिबीरांची, संस्थेने सभासदांसाठी सुरु केलेल्या मृत्यूफंड योजनेची, संस्थेच्या योग प्रशिक्षण वर्गाची महिती दिली. तसेच संस्था सदर सभासदांच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही दिली. संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी उपस्थित मान्यवर पाहुणे व सर्व लाभाथाल्चे आभार मानले तसेच धर्मादाय निधी वाटप समारंभ यशस्वी केल्याबद्दल समस्त संचालक मंडलाचे, संस्थेचे मुखय कार्यकारी आधिकारी हितेश पाटील व संस्थेच्या सर्व आधिकारी व कर्मचारी यांचे विशेष आभिनंदन केले. संस्थेने निर्माण केलेल्या सर्व निधारुचा वापर सभासदांनी आपल्या गरजा भगविण्यासाठी करावा असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचलन मुखय कार्यकारी आधिकारी हितेश पाटील यांनी केले. या समारंभास परिसरातील २५० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!