वसई प्रगती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सो. लि. तर्फे महिला बचत गट मार्गदर्शन शिबीर आणि हळदी कुंकू समारंभ संपन्न

वसई (प्रतिनिधी) : वसई प्रगती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अर्नाळा आणि आगरी समाजविकास मंडळ, वसई तालुका पि.विभार्गें यांच्या संयुक्त विद्यमाने वसई तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गट मार्गदर्शन शिबीर आणि हळदी कुंकू समारंभ गुरुवार, दि.२७ डिसेंबर २०१८ रोजी पाणजू, नायगांव येथील श्री हनुमान मंदीरात संपन्न झाला. सदर समारंभास श्री. मदन किणी,अध्यक्ष आगरी समाज विकास मंडळ, श्री. संदीप जाधव,अध्यक्ष, सोसायटी फॉर ह्युमन ऍबिलीटी डेव्हलपमेंट एज्युकेशन, परळ, वसई प्रगती पतसंस्थेच्या संचालिका सौ. मिनल म्हात्रे व सौ. मनिषा पाटील, वसई प्रगतीचे मुजएय कार्यकारी अधिकारी श्री. हितेश पाटील, पाणजू गावाच्या माजी सरपंच सौ. ह्लाुंँदा विवेकानंद भोईर इ. मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात संस्थेच्या कार्यक्षेत्रातील २५० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री. संदीप जाधव यांनी बचत गटाची स्थापना, बचत गटाचे कामकाज,बँकाकडून अर्थसहाय्य मिळविण्याच्या पध्दती,प्रशिक्षणाचे प्रकार, मार्केटींगचे प्रकार इ. अनेक बाबींचे उत्तम मार्गदर्शन केले. आगरी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. मदन किणी यांनी महिलांच्या विशेष उपस्थितीबददल कौतुक केले व दि. ६ जानेवारी २०१९ रोजी समाजाच्या वार्षिक स्नेहसंमेलनास अगत्याने उपस्थित राहण्यासाठी महिलांना आवाहन केले तसेच वसई प्रगती पतसंस्था करीत असलेल्या सर्व प्रकारच्या सामाजिक कार्याबददल त्यांचे अभिनंदन केले.

वसई प्रगतीचे मुजएय कार्यकारी अधिकारी यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत तसेच संस्था आयोजित करीत असलेल्या विविध मार्गदर्शन/आरोग्य/योग शिबीरांची माहिती दिली. शासनाच्या नवीन धोरणानुसार आपल्या पतसंस्थेने बचत गटांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. संस्थेच्या महिला सभासद व्यवसायासाठी कर्ज घेत नसल्याचे नमूद करतांना महिलांनी स्वत:च्या व्यवसायिक गरजांसाठी व उत्कर्षासाठी आपल्या संस्थेकडून कर्ज घ्यावे असे आवाहन केले. संस्थेने सभासदांसाठी मृत्यूफंड योजना सुरु केली असून संस्थेच्या मयत सभासदांच्या नातेवाईकांना त्वरीत रु. ५,०००/-ची मदत केली जात असल्याची तसेच प्रति सभासद रु.१,५०,०००/- चा अपघात विमा संस्थेच्या जएार्चाने उतरविला असल्याची माहिती दिली. संस्थेचे योग प्रशिक्षण वर्गही सुरु असून सर्व महिलांनी आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. संस्था सभासदांसाठी इतर आरोग्य शिबीरे सातत्याने राबवीत असल्याची माहितीही त्यांनी दिली व उपस्थित महिलांच्या सुचनेनुसार त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था संस्थेमार्फत केली जाईल याची ग्वाही दिली.

कु. अनुजा भोईर यांनी महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, पालघर यांच्या विविध उपक्रम व प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन व संपूर्ण आयोजन संत ज्ञानेश्वर सरस्वती विद्यामंदीर, पाणजू च्या मुजएयाध्यापिका सौ. माधुरी भोईर यांनी केले व शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत गाऊन कार्यक्रमाची उत्तम सुरुवात केली तसेच विविध नृत्य सादर करुन उपस्थितांचे मनोरंजन केले. पाणजू गावातील महिला तसेच वसई प्रगतीचे संचालक श्री. देवेंद्र भोईर आणि कर्मचारी वर्गाने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!