वसई महामार्गावर चार लाखांचा मद्यसाठा जप्त

* वसई राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 

* २ कारसह दोघांना अटक

वसई : वसई मधे गावठी दारुचा पुर सुरु असुन दमण मधून चोरटी दारु वहातुक सुरु असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यातून वसई राज्य उत्पादन शुल्क विभागावर जबर टिकाही करण्यात आली होती. त्याची दखल घेत सदर विभागाने गुरुवारी संध्याकाळी केलेल्या कारवाईत दोन कारसह ४ लाख ८१ हजार रुपयांचा दमण दारुचा मुद्देमाल जप्त केला. यात दोघांना अटक करण्यात आली आहे. आलम पठाण, भूषण पानथळे रा. नालासोपारा अशी अटक आरोपींची नावे आहेत.

गुरुवार दिनांक ६ डिसेंबर रोजी वसई महामार्गा वरुन दमण व दादरा नगर हवेली येथून मद्य साठा येणार असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पेल्हार, तुंगारेश्वर फाटा येथे विविध पथकाद्वारे संध्याकाळी ६.३० वा. सापळा लावण्यात आला होता.

यावेळी एक होंडा सिटी , सेंट्रो कार यामधुन बियर व विदेशी मद्याचा साठा सापडला. एकूण १० बॉक्स जप्त करण्यात आले. सदर मद्याची किंमत १ लाख ७८ हजार रूपये तर वहानासह ४ लाख ८१ हजार ३६० रूपये मुद्देमाल जप्त केला आहे. पालघर पोलिस अधीक्षक विजय भूकन, उप अधीक्षक एम एच शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्ही. एस. मासमार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लवकरच गावठी दारुच्या ठीकाणावर छापे घालण्यात येणार असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!