वसई विकासिनी आयोजित समूह कलाप्रदर्शन

वसई : वसई विकासिनी आयोजित वसई दृक कलामहाविद्यालय व रॉबी डिसिल्व्हा दृक कला महाविद्यालयातील कला अध्यापकांच्या तसेच वसई विकासिनी संस्थेच्या संग्रहातील निसर्गचित्रण कलाकृतीचे समूह कलाप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी , महात्मा गांधी रोड , मुंबई येथील ऑॅडोटोरियम कलादालनातदिनांक २१ ते २७ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या संग्रहात निसर्गचित्राचे व कलासंस्थेतील १२ चित्रकार, कलाध्यापक सहभागी होणार आहेत.

२१ मे रोजी वाजताजहांगीर आर्ट गॅलरीच्या ऑॅडोटोरियम कलादालनात उदघाटन झाला आहे. कलाविद्यार्थ्यांना,कलारसिकांना प्रदर्शन पाहण्यासाठी २१ ते २७ मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. समूह कलाप्रदर्शनातील सहभागी कलाअध्यापक वसई विकासिनीच्या कलासंस्थेत अनेक वर्षांपासून काम करत असतानाच कलानिर्मितीच्या जोपासना करत आहेत.विद्यार्थ्यांच्या वर्गकामाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच कलानिर्मिती क्षेत्रात आपल्या कलाध्यपकाचे नाव व्हावे म्हणून संस्थेतील मान्यवर प्रोत्साहन देत आहेत. कलाध्यापकांचे एकल आणि समूह प्रदर्शन जहांगीर आर्ट सोबत विदेशात झालेले आहेत. राज्यस्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वैयक्तिक व समूह प्रदर्शन देश विदेशात देखील संग्रहित आहेत.

या समूह कलाप्रदर्शनात वसई विकासिनी संस्थेने संस्थेतील चित्रकार व कलाअध्यापक दिगंबर गवळी, धनराज खाडे, दत्तात्रय ठोंबरे, वैभव ठाकूर, प्रवीण शिंदे, चार्ली कोरिया , राहुल कांबळे, सागर पवार, अल्पाईड आर्ट विभागातील राधा गावडे, वर्षा गावडे, दर्शना पाटील, नितीन दाभोलकर या कलावंतांना संधी उपलब्ध करून दिली आहे. कलाकृतीसोबत संस्थेच्या संग्रहात असलेली उत्तम दर्जाची निसर्गचित्रणे यासमूह कला प्रदर्शनात आकर्षण असणार आहे पालघर, ठाणे , मुंबई व उपनगरातील कलारसिकांनी, या कलाप्रदर्शनचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नारायण मानकर, कार्याध्यक्ष शिरीष पाठारे,सरचिटणीस विजय वर्तक, कलासमितीचे प्रमुख अजय उसनकर,पदाधिकारी आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!