वसई विकासिनी कॉलेज तर्फे भव्यदिव्य कलाप्रदर्शना चे आयोजन

वसई  : वसई विकासिनी संचालित,  रॉबी डिसिल्व्हा व वसई विकासिनी दृक कला महाविद्यालय संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाचे ३४ वे वार्षिक कला प्रदर्शन शनिवार दिनांक २३ ते मंगळवार २६ फेब्रुवारी या कालावधीत समाज उन्नती मंडळ ,माणिकपूर,वसई (पश्चिम) येथे आयोजित करण्यात येत आहे. या कलाप्रदर्शनाचे उदघाटन शनिवार २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५  वाजता प्रमुख पाहुणे राजीव मिश्रा (कलासंचालक-महाराष्ट्र राज्य,मुंबई व विशेष अतिथी) विकास वर्तक (अध्यक्ष विध्यावर्धिनी संस्था,वसर्इ) व जगदीश राऊत (उपाध्यक्ष-वसई विकास बँक) ह्यांच्या उपस्थितीत होत आहे.

विदयार्थी कलाप्रदर्शनची पूर्व तयारी करतांना

तालुकास्तरीय वसई विरार शहर महानगरपालिका व वसई विकासिनी महाविद्यालय आयोजित बालचित्रकला प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभ सोमवार २५ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजता असून.प्रमुख पाहुणे महेश देसाई (अध्यक्ष-वसई जनता बँक)  माधवी तांडेल (गट शिक्षणाधिकारी-पंचायत समिती) ,  राजू कांबळी (आरोग्य सभापती-वसई विरार शहर महानगरपालिका) ह्यांच्या उपस्थितीत होत आहे.

कलाप्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ मंगळवार २६ फेब्रुवारी रोजी संध्या. ५:३० वा. प्रमुख पाहुणे महापौर रुपेश जाधव,प्रकाश रोड्रिक्स (उपमहापौर), वृंदेश पाटील (सभापती, एच प्रभाग) वसई-विरार शहर महानगरपालिका,  ओनील आल्मेडा (अध्यक्ष-बेसिन कॅथॉलिक बँक) ह्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

प्रदर्शनातील कलाकृती विध्यार्थ्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण केल्या असून मनाचा वेध घेणाऱ्या आहेत. सदर प्रदर्शन कला महाविद्यालयातील विध्यार्थी,कलाशिक्षक व स्थानिक कलारसिकांना तसे च मुंबई व उपनगरातील चित्रकारांना पहावयास मिळणार आहेत.

प्रदर्शन २४, २५ व २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. ह्या कलाप्रदर्शनात कलासाधनेचा अपूर्व संगम कलारसिकाना पहावयास मिळणार आहे. तरी समस्त कलारसिक,कलाशिक्षक, कलाविध्यार्थी व शाळेच्या विध्यार्थ्यांनी प्रदर्शनास अगत्याने भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नारायण मानकर, कार्याध्यक्ष शिरीष पाठारे, सरचिटणीस विजय वर्तक व प्राचार्य दिगंबर गवळी ह्यांनी केले आहे. या प्रदर्शनात वैशिष्ठय पूर्ण लक्षवेधक व आकर्षण म्हणून सुंदर व मनमोहक इन्स्टॉलेशन सादर करण्यात येणार असून त्याचाही आनंद कलारसिकाना घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!