वसई विकास बँकेला उत्कृष्ट नागरी बँक पुरस्कार

वसई : वसई तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वसई विकास सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँकेचा उत्कृष्ट नागरी बँक पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात  देण्यात आला. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँकेतर्फे एक हजारावरील ठेवी असलेल्या विभागात वसई विकास सहकारी बँकेला “पदमभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी बँक” पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. कोकण विभागतून बँकेची या पुरस्कारासाठिव निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण आज मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला बँकेचे चेरमन हेमंत म्हात्रे, व्हाईस चेरमन जगदीश राऊत, जेष्ठ संचालक आशय राऊत, महेश म्हात्रे, उमेश पाटील, केवळ वर्तक, भूषण सावे, विलास वर्तक आदी संचालक उपस्थित होते . बँकेला मिळालं;इल्या या पुरस्कार बाबत बँकेवर विविध स्तरातून अभनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!