वसई विजयोत्सव ऑॅनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

वसई : वसई विजय दिनाच्या २८२ व्या पर्वाचे औचित्य साधून उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ, महाराष्ट्र अंतर्गत दिनांक १० मे २०२० रविवार वैशाख कृ 3 संकष्ट चतुर्थी रोजी ऑॅनलाइन वसई विजयोत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. सदर स्पर्धा महाराष्ट्र प्रांतातील जिज्ञासू, इतिहासप्रेमी यांसाठी पूर्णपणे निशुल्क असून ऑॅनलाइन व्हाटसएपच्या माध्यमातून घेण्यात आली. सायंकाळी ठीक ५ ते ५.३० या वेळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ५० व्यक्तींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत स्पर्धेकांना एकूण १५ प्रश्न विचारण्यात आलेले होते. यात सर्व प्रश्न वसई रणसंग्रामाशी निगडीत होते.

वसई विजयोत्सव ऑॅनलाइन प्रश्नमंजुषा

प्रीतम पाटील

वसई विजयोत्सव ऑॅनलाइन प्रश्नमंजुषा 2

संदीप खांबे

दिनांक १२ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता सदर स्पर्धेचा निकाल ऑॅनलाइन जाहीर करण्यात आला.वेळ मर्यादा व अचूक उत्तरे या गोष्टी साधत सदर स्पर्धेत श्री प्रीतम पाटील नावझे (सफाळे) प्रथम क्रमांक व श्री संदीप खांबे (वसई) द्वितीय क्रमांक मिळवला. दोघांना अनुक्रमे ११ व ६ गुण प्राप्त झाले. वसई विजयदिनाचे मुख्य ऐतिहासिक महत्त्व, वसई मोहिमेत उल्लेख असणारी दोन दैवते, तांदुळवाडी किल्ल्याचे पोर्तुगीजकालीन नाव, वसई मोहिमेतील एकूण गडकोट संख्या अशा पध्दतीच्या एकूण १५ प्रश्नांनी स्पर्धेत रंगत आणली. सदर स्पर्धेत मुंबई, पालघर, पुणे, नवी मुंबई, डोंबिवली, वसई इत्यादी भागातून स्पर्धेक सहभागी झालेले होते. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाचे अभ्यासक डॉ श्रीदत्त नंदकुमार राऊत यांनी स्पर्धा परीक्षक म्हणून भूमिका बजावली. गौरवशाली वसई विजय दिनाचे औचित्य साधून सदर स्पर्धा सर्वांना आनंददायी व मार्गदर्शक ठरली. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ अंतर्गत एका विशेष कार्यक्रमात विजेत्यांना विशेष सन्मान चिन्ह भेट म्हणून देण्यात येणार आहे. वसई विजयदिनाच्या निमित्ताने वसईचा रणसंग्राम, वसई प्रांत गडकोट, चिकित्सक संशोधन इत्यादी विषयक संशोधनास चालना मिळावी यासाठी सदर स्पर्धा विशेष ठरली.

उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाच्या मुंबई प्रतिनिधी दिव्या वराडकर ताई यांच्या मते ”गौरवशाली वसई विजय दिनाला प्रश्नमंजुषा स्पर्धा अंतर्गत एक आगळी मानवंदना देणारा हा उपक्रम अनेकांना मार्गदर्शक ठरला असून विशेषत: वसई रणसंग्रामाबाबत सविस्तर जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांत वाढीस लागल्याचे चित्र स्पष्ट झाले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!