वसई विधानसभा क्षेत्रात भाजपच्या सीएम चषक स्पर्धा, शनिवारी वसंत नगरी मैदानावर शानदार शुभारंभ

वसई (मनिष म्हात्रे) :  राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांत 30 अाॅक्टाेबर 2018 ते 12 जानेवारी 2019 दरम्यान ‘सीएम चषक’ क्रीडा महोत्सव आयोजित केला जात आहे.वसई विधानसभा क्षेत्रात सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ,शनिवारी या स्पर्धेच्या शानदार शुभारंभासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन  उपस्थित राहणार आहेत.यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर,खासदार राजेंद्र गावीत, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा,वसई विरार शहर जिल्हा अध्यक्ष सुभाष साटम,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील  आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, क्रीडा कौशल्यांचा विकास व्हावा तसेच ऑलम्पिकसारख्या स्पर्धेत जिल्ह्यासह राज्यातील खेळाडूंची संख्या वाढावी आणि खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यात 1 ते 25 डिसेंबर या कालावधीत ”सीएम चषक स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या आहेत.वसई विधानसभा क्षेत्रातील या स्पर्धांचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहे.शनिवारी (1 डिसेंबर) रोजी वसई पूर्व,  वसंत नगरी मैदानावर संध्याकाळी 4 वाजता या स्पर्धेचा शानदार शुभारंभ करण्यात येणार आहे.या ठिकाणी 8 क्रिडा व 4 सांस्कृतिक कला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चाचे अध्यक्ष ब्रीजेंद्रकुमार,संघटन सरचिटणीस निलेश राणे,सरचिटणीस अभय कक्कड, सत्येंद्र रावत,प्रमोद सिंग आदि पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत.
‘सिएम चषक’ या स्पर्धेत राज्यस्तरावर खेळण्याची व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक करण्याची संधी मिळणार असल्याने या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने 1 ते 25 डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरावर आणि 30 ते 5 जानेवारी 2019 या कालावधीत जिल्हास्तरावर ”सीएम चषक स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या आहेत.तसेच 11 व 12 जानेवारी 2019 ला राज्य स्तरावर मूख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. 
खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो भारतचा नारा दिला होता. त्यांनंतर झालेल्या विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदके मिळविणारे खेळाडू हे ग्रामीण भागातील असल्याचे स्पष्ट झाले होते.त्यामुळे ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, क्रीडा कौशल्यांचा विकास व्हावा तसेच ऑलम्पिकसारख्या स्पर्ध्येत जिल्ह्यासह राज्यातील खेळाडूंची संख्या वाढवी आणि खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ”खेलो महाराष्ट्र” चा नारा दिला आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा खेळाडू निर्माण करणे व खेळाडूंचा शोध घेणे हा आहे.तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचली हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेत आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, जलयुक्त शिवार हॉलीबॉल स्पर्धा, शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा, सौभाग्य  खो खो स्पर्धा, उड्डाण 100 मीटर धावणे स्पर्धा(पुरुष-महिला), मुद्रा योजना 400 मीटर धावणे (पुरुष/महिला), स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा, कौशल्य भारत कॅरम स्पर्धा, उज्वला नृत्य स्पर्धा (एकेरी/ग्रुप), उजाला गायन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या जिल्हास्तरावर सहभाग घेता येणार आहे.
जिल्हस्तरावर क्रमांक पटकाविणाऱ्यांना 11 ते 12 जानेवारी 2019 या कालावधीत राज्यस्तरावर खेळण्यास मिळणार आहे. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या आकर्षक बक्षीस व चषक दिला जाणार  आहे. विधानसभा क्षेत्रातील सीएम चषक स्पर्धा ही जिल्ह्यात होणारी  मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत वसई विधानसभेत आतापर्यंत 20 हजार स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे.तालुका व जिल्हा स्तरावर होणाऱ्या सीएम चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने नाव नोंदणी करता येणार आहे. www.cmchashak.com येथे ऑनलाइन व तालुक्याच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतिने हि नोंदणी 15 डिसेंबर 2018 पर्यंत  करण्यात येणार आहे.
युवा खेळाडूंना खेळाचे व्यासपीठ मिळावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सीएम चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहीचे प्रशस्तीपत्रक देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!