वसई-विरारची भार्गवी संखे हिची सुवर्ण कामगिरी…

वसई (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने लातूर मधील जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक ३ ते ५ डिसेंबर रोजी आयोजित १४,१७,१९ वर्षाखालील मुला मुलींच्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुणे विभागाने विजेतेपद, मुंबई विभागाने उपविजेतेपद तर कोल्हापूर विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला. ह्या स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध भागातून साधारणत: ४०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

कराटे व किक बॉक्सिंग मधे सातत्याने चमकदार कामगिरी करणारी वसई-विरार ची खेळाडू भार्गवी प्रशांत संखे हिने १७ वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावित पालघर जिल्ह्याचे नाव किक बॉक्सिंग मधे कायम राखले. दिल्ली इथे होणाऱ्या ‘६५ ब्या राष्ट्रीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा २०१९-२०’ साठी भार्गवी ची निवड महाराष्ट्र संघात झाली. कीक बॉक्सिंग बरोबरच कराटे मधे आपली कामगिरी सतत उंचवणारी भार्गवी हिने कराटे मधे लागोपाठ सहा वर्ष शालेय कराटे स्पर्धेमध्ये राज्याच्या संघामध्ये सहभाग घेत अशी कामगिरी करणारी महाराष्ट्रातील एकमेव करातेपतू चा सन्मान प्राप्त केला आहे.

भार्गवी सोबत त्यांच्याच क्लबच्या वसई-विरारच्या वेलमा रेमेडी अस व प्रियल पाटील ह्या दोन खेळाडूंनी १४ वर्षाखालील वयोगटात कास्यपदक मिळविले. ह्या मिळविलेल्या यशाबद्दल सर्वांनी तमाम वसई विरारच्या जनतेचे , आपले कोच सूर्यप्रकाश मुंडापट व प्रशांत संखे ह्याचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: