वसई-विरार पालिकेची शहरासाठी आरोग्य सेवा मोफत ; विन्यामुल्य वैद्यकिय सेवा देणारी पहिली महानगरपालिका

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारी आरोग्यसेवा मोफत करण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत दिल्या जाणाऱ्या मोफत वैद्यकिय सेवा योजनेचा शुभारंभ आज शुक्रवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते झाले.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय सेवा आजपासून मोफत केली आहे. याचा शुभारंभ आज तुळींज हॉस्पीटल, नालासोपारा येथे प्रथम महिला महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर रुपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज,आरोग्य सभापती राजेंद्र कांबळी, महिला बाल कल्याण सभापती माया चौधरी,अति आयुक्त रमेश मनाले, डॉ.प्रविण क्षिरसागर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिके कडे सध्या २ रुग्णालये, ३ माता बाल संगोपन केंद्र, २१ आरोग्य केंद्र आहेत. या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठया प्रमाणावर असून त्यांना येणार कमीत कमी खर्च देखील परवडण्यासारखा नसतो. हि बाब लक्षात घेऊन माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी जानेवारी २०१९ मध्ये महासभेत वैद्यकीय सेवा मोफत मिळावी असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव वसई तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने त्यांच्या या प्रस्तावाला महासभेत तात्काळ मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आजया मोफत आरोग्य सेवेचे उदघाटन करण्यात असूनआज पासूनवसई विरार मधील सर्व नागरिकांना हि सुविधा मोफत मिळण्यास सुरवात होणार आहे. यामध्याये महानगरपालिका रुग्णालयामध्ये उपलब्ध सेवा सुविधेसाठी कोणत्याही प्रकारचे दर आकारले जाणार नाही, कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत याबाबतची माहिती महानगरपालिका रुग्णालयामध्ये ठळक ठिकाणी प्रदर्शित करण्यांत येणार आहेत.यासाठी महापालिकेने सुमारे ८३ कोटी खर्चाची तरतूद केली आहे.

अत्याधुनिक शस्त्रक्रिया करीत व वैद्यकीय सेवांकरिता वसई विरार शहर महानगरपालिकेने चंदनसार, विरार पूर्व येथे सातमजली ट्रामा केअर रुग्णालयाचे काम सुरु असून सर्व खर्चिक वैद्यकीय सेवा गरीब व गरजू लोकांना अल्पदरात पुरविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. तसेच नारिंगी आणि उमराळे येथे माता बालसंगोपन केंद्रांसाठी प्रशाकीय मंजुरी देण्यांत आली आहे.

पालिकेतर्फे लवकरच शिशु स्वागत किट नागरीकांच्या भेटीला

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना आता महापालिके मार्फत मिळणार शिशु स्वागत किट देण्यात येणार आहे. या शिशु स्वागत किट मुळे नवजात मुलांना जन्म देणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील आर्थिक भार हा मोठया प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे.असे प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर यांनी सांगितले.

वसई-विरार महापालिकेतर्फे सन  २०१९-२० च्या अर्थसंकल्पात महिला आणि बालकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये शिशु स्वागत किट योजना हि नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. नवजात बालकाला जन्म दिल्यानंतर सर्वसामान्य महिलेला अनेक आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागते. त्यांच्या डोक्यावरील हा भार कमी व्हावा यासाठी महापालिका रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसुतीच्यावेळी मुलांच्या संगोपनासाठी हे किट मिळणार मोफत असेल अशी संकल्पना प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर यांनी महापालिकेसमोर मांडली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात सदर योजनेस मंजुरी मिळाली असून लवकरच सर्व सोपस्कर पूर्ण करुन ही योजना सुरु होईल,असे महापौररुपेश जाधव यांनी सांगितले.

या शिशु स्वागत किट मध्ये, लहान मुलांचे कपडे,  गादी, टॉवेल,थर्मामिटर, तेल, मच्छरदाणी, गरम ब्लँकेट, चटई, शॅम्पो, खेळणी,खुळखुळा, लहान नेलकटर, मुलासाठी हातमोजे-पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, मुलाला गुंडाळून ठेवण्यासाठी कापड, आईसाठी लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्विड या सर्व वस्तूंचा समावेश शिशु स्वागत किट मध्ये असणार आहे. जावजात रुग्ण बालकास आवश्यक सुविधा पुरविणेकामी यंदाच्या अर्थसंकल्पात १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!