वसई-विरार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना डिसेंबरअखेर सुरु करणार – बबनराव लोणीकर

मुंबई, दि. 23 : वसई-विरार येथील 69 गावाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना डिसेंबरअखेर सुरु करण्यात येणार आहे. यातील 15 गावास सध्या पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली.    वसई-विरार व पालघर जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी श्री.लोणीकर बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावीत,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी.वेलरासू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.   यावेळी श्री. लोणीकर म्हणाले, पालघर जिल्ह्यातील केळवे माहिम व 18 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची तांत्रिक मान्यता डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. सद्यस्थितीत योजनेच्या संकल्पनेचे काम पूर्ण झाले असून सन 2018-19 च्या नवीन दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पालघर जिल्ह्यातील उंबरपाडा, नंदाडे व 32 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची सविस्तर अंदाज पत्रके व आराखडे तयार करण्याची कार्यवाही उप विभाग, पालघर मार्फत सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!