वसई विरार मधील माजी सैनिक, शहिदांच्या विधवांच्या कुटुंबियांसाठी साकारतेयसंघटना ; २४ नोव्हेंबर रोजी बैठक

वसई (वार्ताहर) : अलिकडच्या काळात, पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव येथे रहिवाशांच्या गर्दीत अनेक माजी सैनिकही येथे विसावले आहेत. सशस्त्र सैन्यातून अंदाजे २००० सेवानिवृत्त झालेले सैन्य, त्यांच्या विधवा, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह, या उपनगराच्या परिसरातच राहत आहेत. या सर्वांचे शासकीय, निमशासकीय स्तरावरील, तसेच दैनंदिन जगण्यातील अनेक प्रश्न असून त्यांचा सामना करणे सुलभ व्हावे, म्हणून एक संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न काही माजी सैनिक करीत आहेत. त्यासाठी दि.२४ नोव्हेंबर रोजी विरार मध्ये एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपनगरामध्ये सेवानिवृत्त सैनिक, त्यांच्या विधवा, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी पॉली क्लिनिक, इस्पॅनेल रुग्णालये, कॅन्टीन, नोकरीच्या संधी यासारख्या सुविधा नाहीत. म्हणूनच त्यांपर वैद्यकीय तपासणी आणि कॅन्टीन सुविधा मिळविण्यासाठी उपनगरापासून दूर असलेल्या कोलाबा येथील कमांड हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी भाग पडते. त्यामुळे माजी सैनिक, युध्द विधवा आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींसह बऱ्याच गैरसोयी निर्माण होत आहेत. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि या मूलभूत सुविधाही सुलभ व्हावे यासाठी, सर्व माजी सैनिकांना एकाच छताखाली येउन एकत्रितरित्या एक संघटना स्थापन करायचे ठरवले आहे. दि. २४ नोव्हेंबर २०१९, रोजी सकाळी ११ वाजता रुम क्र. ३१९ , सेमिनार हॉल, जुना विवा कॉलेज, विरार (पश्चिम), जि. पालघर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व माजी सैनिक, शहिदांच्या विधवा आणि त्यांच्या वर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना या बैठकीत सहभागी होण्याची जाहीर विनंती या संघटना बांधणीसाठी पुढाकार घेत असलेले भारतीय नेव्ही मधील निवृत्त अधिकारी रजनीशकुमार यांनी केली आहे.

वसई-विरार माजी सैनिक कल्याण संघटनेची संयुक्त संस्था स्थापन करण्याचे निश्चित करणे,  सदस्यांसाठी वसई-विरारमधील पॉलिक्लिनिक, कॅन्टीन इत्यादींसाठी प्रयत्न करणे, कायमस्वरूपी सदस्यांची गटाद्वारे निवड होईपर्यंत आणि संघटनेची नोंदणी होईपर्यंत गट चालविण्यासाठी तात्पुरते अधिकाऱ्यांची नेमणूक करणे,  सदस्यांनी ठरविल्यानुसार मासिक वर्गणी गोळा करणे,  सदस्याचे वर्गणीदार नोंद ठेवणे, स्थानिक पातळीवर माजी सैनिक आणि शहिदांच्या विधवा यांच्या तक्रारी हाताळणे, नुकतेच सेवा निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी नोकरीच्या संधी आणि मार्गदर्शनाचे अन्वेषण, शिकलेल्या सदस्यांकडून लघु उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन करणे,  कामावर देखरेख ठेवण्यासाठी आणि सर्व माजी सैनिक संघटनेला एकत्रित ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एक बैठक आयोजित करणे, पेंशन आणि अन्य हक्कांसाठी शहिदांच्या विधवा आणि मुलांना मदत करणे इत्यादी निर्णय या बैठकीत घ्यावयाचे असल्याचे रजनीश कुमार यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी, तथा या नियोजित संघटनेसाठी योगदान देऊ इच्छिणारांनी ९३२३७५९९१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!