वसई-विरार मधील ६९ गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत लवकरच करवाई करावी – विवेक पंडित

वसई (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात वसई-विरार तालुक्यातील ६९ गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष नागरिकांना भेडसावत आहे. परंतु आजपर्यंत त्यावर ठोस अशी योजना. झाली नाही. मी वसई विधानसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व करीत असताना वसई तालुक्यात एकूण ६९ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण करून घेतले. त्या बांधलेल्या जलकुंभांना आज ७ वर्षे होऊन गेली तरी त्यात अजूनही पाणी पुरवठा सुरु झाला नाही.

पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे वसईतील जनतेला टँकर मधून पाणी मागवावे लागतो. परंतु टँकरद्वारा पुरविण्यात येणारे पाणी हे दूषित स्वरूपाचे असल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते. टँकरने पाणी पुरविण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात असल्यामुळे वसई तालुक्यात टँकर लॉबी अस्तित्वात आली आहे. या त्रासाला वसईतील जनतेला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वसई-विरार महानगरपालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करूनही या प्रश्नावर कोणीच कार्यवाही झाल्याचे कळले नाही.

या ६९ गावांच्या पाण्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत ३० ऑॅक्टोबर२०१८च्या बैठकीत हा प्रश्न मांडला होता. त्यावर आपण पाणी पुरवठा विभाग व नगर विकास विभाग यांची स्वतंत्र बैठक आययोजित करण्याचे निर्देश ही दिले होते. परंतु आज ७ महिने होऊनही तशी कोणतीच बैठक आयोजित केल्याचे कळविण्यात आलेली नाही.

तरी पिण्याच्या पाण्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तांबडतोड एका महिन्यात कारवाई केली जाईल या संबंधीचे आदेश संबंधित अधिकारयांना देउन वसईच्या जनतेची या त्रासातून सुटका करावी,अशी मागणी विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!