वसई-विरार महापालिका जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर असंवेदनशील ; माजी आमदार घोन्सालवीस यांचा आरोप 

दिघा-सांडोर धक्क्याच्या कामाकडे दुर्लक्ष !

वसई, दि.१५ (वार्ताहर) अपघात घडू नये, म्हणून नागरी समस्याविषयी करदात्या जनतेने मागणी करूनही उदासीन भूमिका घेणारी वसई-विरार महापालिका जिव्हाळ्याच्या जनप्रश्नावर असंवेदनशील असल्याचा आरोप माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस यांनी एका पत्रकान्वये केला आहे. 

याबाबतची माहिती अशी की,  वसई पश्चिम भागातील तर्खड ते सागरशेत या वर्दळीच्या मार्गावरील दिघा-सांडोर येथील बावखलावरील धक्का गेल्या जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे फुटून वाहून निघाला होता. येथून होणारी मोठ्या प्रमाणातील रहदारी आणि धक्क्याअभावी लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते, तथा बॅसीन कॅथॉलिक बँकेचे माजी अध्यक्ष नाझरे थ कुटीनो यांनी येथील धक्क्याची योग्य दुरुस्ती किंवा नवा धक्का बांधण्याची मागणी केली होती. 
तथापि, आठ-नऊ महिने उलटूनही या जनतेच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महापालिका प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांना लक्ष द्यायला वेळ न मिळाल्यामुळे अद्यापही धक्क्या अभावी लोकांचे हाल सुरु असून, या प्रकरणी केलेला पाठपुरावा व्यर्थ ठरला आहे. एक महिन्यापुर्वी एक तरुण आपल्या आईसह येथून जात असता, आपल्या मोटर-सायकलसह बावखलात पडला. त्यास ग्रामस्थांनी बाहेर काढले. त्यास दुखापत झाली.
याठिकाणी आणखी मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची महापालिका प्रशासन वाट पहात आहे का? असा संतप्त सवाल माजी आमदार घोन्सालवीस यांनी या पत्रकाव्दारे केला असून, या धक्क्याचे काम त्वरित हाती घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. (

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!