वसई-विरार महापालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर

वसई (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या तिसऱ्या सार्वक्षिक निवडणूकीसाठी प्रभागावर आरक्षण जाहीर झाल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण तयार झाले आहे.

महापालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणूकीत ११५ प्रभाग होते या प्रभागाची संख्या आणि रचना कायम ठेवण्यात आली असून, लवकरच त्यासाठी निवडणूका होणार आहेत. त्यासाठी दि.२८ रोजी दुपारी प्रभागांवर आरक्षण टाकण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पार पाडली. या आरक्षणासाठी तालुक्यातील शेकडो लोकप्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्यामुळे विरारचा वर्तक हॉल तुडुंब भरला होता. आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही जणांनी आपला प्रभागाचे आरक्षण मनाजोगते झाल्यामुळे जल्लोष केला. तर काहींनी आरक्षण पडल्यामुळे आपला पत्ता कट झाल्याची भावना व्यक्त केली.

महापौर, माजी महापौर, सभापती, नगरसेवक यांच्यासह अनेक नगरसेवकांचे सद्याचे प्रभाग महिलांसाठी आरक्षीत झाले आहे. महापौर प्रवीण शेट्टी यांचा प्रभाग ओ.बी.सी महिलांसाठी राखीव झाला आहे. तर उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, सभापती भरत मकवाना, अतुल साळुंखे, सखाराम महाडिक, सभागृह नेते फ्रॅन्क आपटे, राजु कांबळी, माजी महापौर रुपेश जाधव, नगरसेवक दिलीप गोवारी, यज्ञेश्वर पाटील, रणजीत पाटील, विनय पाटील, महेश पाटील, सुदेश चौधरी, पंकज चोरघे, मार्शल लोपीस, अजीत नाईक, किशोर नाना पाटील, प्रकाश चौधरी, मिलींद घरत,किसन बंडागळे,अरुण जाधव, राजेश ढगे, समीर डबरे वृंदेश पाटील,चंद्रकांत गोरिवले, स्वप्नील बांदेकर, सिताराम गुप्ता, प्रफुल्ल पाटील, सचिन घरत, कल्पेश मानकर, मनिष वर्तक, लॉरेल डायस यांच्या प्रभागावरही महिलांचे आरक्षण पडले आहे.

तर सभापती भारती देशमुख,ऍड.अंजली पाटील आणि शोभा मोरे यांचे प्रभाग त्यांच्यासाठी सुरक्षित राहिले आहेत. त्यामुळे या आरक्षणानंतर कही खुशी तर कही गम असे वातावरण दिसून आले. ११५ प्रभागांपैकी १२ प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी, ३६ प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी १५ प्रभाग मागास प्रवर्गातील महिलांसाठी, ४ प्रभाग नागारिकांच्या मागास पुरुष प्रवर्गासाठी, ३ प्रभाग अनुसुचित जातीतील महिलांसाठी ३ प्रभाग अनुसुचित जमातीतील महिलांसाठी, २ प्रभाग अनुसुचित जातीतील पुरुषांसाठी आणि २ प्रभाग अनुसुचित जमातीतील पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच ३८ प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!