वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये १६००० हून अधिक स्पर्धकांसोबत देशातील आघाडीच्या अ‍ॅथलीट्सचा सहभाग

विरार  : नवीन हौशी धावपटूंना आकर्षित करण्यासोबतच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्याची संधी मिळावी याकरता इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटासाठी ५ किमी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. सिग्ना टीटीके च्या सहाय्याने होणारी ही स्पर्धा ९ डिसेंबर२०१८ ला पार पडेल. यासोबत आघाडीच्या एलिट अ‍ॅथलीट्सचा सहभाग असलेल्या या स्पर्धेमध्ये महिला हौशी धावपटूंना महिलांच्या पुर्ण मॅरेथॉनमध्ये नवीन वयोगटाचा समावेश करण्यात आल्याने आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच बक्षीस रकमेच्या वाढीसह बॅटल रनमध्ये आणखीन चांगले प्रयोग करण्यात  येणार असल्याची घोषणा स्पर्धेच्या आठव्या महापौर मॅरेथॉनची महानगपालिकेच्या विरार येथे झालेल्या प्रेसकॉन्फरन्स मध्ये बुधवारी करण्यात आली.

देशातील ही एकमेव राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा आहे. ज्याचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते. भारतीय अ‍ॅथलीट्सचा विचार करता ही बक्षीसांच्या दृष्टीने त्यांच्यासाठी मोठी स्पर्धा आहे. व्यावसायिक व हौशी अ‍ॅथलीट्सच्या वेगवेगळ्या वयोगटात तब्बल ४२ लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येतात. स्पर्धेच्या माध्यमातून देशात सुरु असलेल्या आरोग्य व फिटनेसच्या चळवळीला चालना मिळत असून मुंबईठाणेनवी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्हे व इतर राज्यातील धावपटूंच्या सहभागामुळे ही चळवळ आणखीन व्यापक झाली आहे.रन फॉर हर लाईफ या घोषवाक्याने यंदाच्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यांत आली आहे.

 पालघर जिल्ह्यातील मुले व मुली यांनी धावण्याकडे गांभीर्याने पहावे व त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा यासाठी प्रोत्साहन देखील देण्यात येते. त्यामुळे अनेक स्पर्धांमध्ये ही मुले सहभाग नोंदवत चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ओळख मिळण्यासोबत त्यांना आर्थिकदृष्ट्या हातभार देखील मिळत आहे. याची घोषणा वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर श्री. रुपेश जाधव यांनी केली. मुख्य प्रायोजक इंडियाबुल्स होम लोन्स आणि सहाय्यक प्रायोजक सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स यांच्या सातत्यपुर्ण पाठींब्यासाठी त्यांचे स्वागत केले.

 यावेळी महापौर रुपेश जाधव,स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी,सभापती सखाराम महाडीक,चिरायु चौधरी,सरिता दुबे, नगरसेवक पंकज ठाकूर,हार्दीक राऊत, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे आणि स्पर्धेचे आयोजक सचिव प्रकाश वनमाळी व संदेश जाधव यांची उपस्थिती होती. यासोबत न्यु विवा कॉलेजविरार,वेन्यु पार्टनर आणि एनर्झालद एनर्जी ड्रिंक पार्टनर एनर्झाल यांच्या सातत्याने  करत असलेल्या पाठींब्यासाठी त्यांचे आभार मानले. स्पर्धेचे आयोजन वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित ही स्पर्धा आर्यन्स स्पोर्ट्स पीआर अँड इव्हेंट्सकडून प्रमोट केली जाते. या मॅरेथॉनला २०१२ साली राष्ट्रीय दर्जा देण्यात आला.

 वसई विरार शहर महानगरपालिका प्रायोजक व सहाय्यक यांच्या मदतीने वसई विरार महापौर मॅरेथॉन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासोबतच या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविणा-या सर्व राज्यातील यासह देशातील अ‍ॅथलीट्सचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी पुरुष व महिलांच्या पुर्ण मॅरेथॉन आणि पुरुष व महिलांच्या अर्धमॅरेथॉन,पुरुष व महिलांच्या ११ किमी रनमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे माननीय महापौर म्हणाले.

 देशातील अनेक अ‍ॅथलीट्सना आकर्षित करणा-या या स्पर्धेचे आयोजन करण्याचा वसई विरार शहर महानगरपालिकेला अभिमान आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविणा-या प्रत्येक स्पर्धकाला धावण्याचा चांगला अनुभव मिळावा यासाठी महानगरपालिका नेहमीच प्रयत्नशील आहे. प्रत्येक खेळाडूचे आरोग्य सुदृढ व्हावे याकरिता महापालिका वर्षाभर विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करित आहे. महापौर मॅरेथॉन याचाच एक भाग आहे असे अति.आयुक्त रमेश मनाले म्हणाले.

 AFI आणि AIMS ची मान्यता :

इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येते. यासोबत स्पर्धेचा रुट हा  असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स (AIMS) यांच्याकडून मोजण्यासोबत मान्यताप्राप्त करण्यात येतो.

५ किमी टाईम रन : 

नवीन ५ किमी टाईम रनमध्ये पुरुष व महिला गटात चार वयोगट करण्यात आले आहे.यामध्ये १५ ते ३० वर्षाखालील३० ते ४० वर्षाखालील४० ते ५० वर्षाखालील आणि ५० आणि त्याहून अधिक असे वयोगट करण्यात आले आहेत. अव्वल तीन स्थानाच्या विजेत्यांना अनुक्रमे ८००० ,६००० आणि ४००० रुपये बक्षीसरुपी मिळणार आहेत.

  महिलांच्या पुर्ण मॅरेथॉनमध्ये १८ ते ३५३५ ते ४५ आणि ४५ व त्याहून अधिक गटाला बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गटातील अव्वल तीन धावपटूंना अनुक्रमे ३५,०००२५,००० व २०,००० रुपये बक्षीसरुपी मिळणार आहेत.

 २०११ मध्ये सुरुवात झाल्यापासून देशातील अनेक व्यावसायिक व हौसी धावपटूंनी वर्षानुवर्षे आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा केली आहे. २०१७ साली करण सिंग याने पुरुषांची पुर्ण मॅरेथॉन जिंकली तर,अंकित मलिक व स्वाती गाढवे यांनी अनुक्रमे पुरुष व महिला अर्धमॅरेथॉनचे जेतेपद मिळवले होते. या अ‍ॅथलीट्ससोबत दिप चंदलिंगखोय बिनिंगराम सिंग यादवएलम सिंगनीरज पाल सिंगखेता रामसनवरु यादवनितेंदर सिंग रावतजी. लक्ष्मणनराहुल पाल. बी सी तिलकसोजी मॅथ्यु आणि इतर अ‍ॅथलीट्सनी पुर्ण व अर्ध मॅरेथॉनमध्ये चमक दाखवली. महिला अ‍ॅथलीट्समध्ये कविता राऊतसुधा सिंगललिता बाबरमोनिका आथरे,मोनिका राऊतरोहिनी राऊत आणि प्रियंका सिंग पटेल यांनी सहभाग नोंदवला आहे. यांच्यासह मुंबईठाणेनवी मुंबईसह राज्यातील इतर जिल्हे आणि देशातील इतर राज्यांमधील हौशी धावपटू आपला सहभाग नोंदवतील. वसई विरार शहर महानगरपालिकेकडून त्यांना राहणेजेवण्याच्या सोयीसोबतच बाहेरील अ‍ॅथलीट्सना स्थानिक प्रवासव्यवस्था देखील पुरविण्यात येणार आहे.

 बॅटल रन होणार आणखीन मोठी आणि उत्तम : 

रनिंग ग्रुपसाठी भारतातील एकमेव बक्षीस रक्कम असणारी स्पर्धा बॅटल रन २०१६ साली इंडियाबुल्स होम लोन्स यांच्यामार्फत सुरु झाली. सांघिक असलेल्या या स्पर्धेत अर्ध मॅरेथॉन व ५ किमी अंतरामध्ये गेल्या वर्षी ३५ ग्रुपना आकर्षित केले होते. अर्ध मॅरेथॉन स्पर्धा ही चार सदस्यांसाठी असते ज्यामध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश असतो.तर५ किमीची स्पर्धा तीन सदस्यांसाठी असते. बॅटल रनच्या माध्यमातून अनेक रनिंग ग्रुपना आपले कौशल्य दाखवण्यासोबतच त्यांना बक्षीसही मिळते.  सर्व खेळांडु अर्ध मॅरेथॉन व ५ किमी अंतर धावू शकतात. त्यांच्यातील सर्वोत्तम सरासरी वेळेने विजेता घोषित करण्यात येतो.

अर्ध मॅरेथॉन गटाच्या बॅटल रनची बक्षीस रक्कम तीन लाख असून विजेत्या संघाला १.५० लाख रुपये बक्षीसरुपी मिळणार आहे. तरपहिल्या व दुस-या उपविजेत्या संघांस अनुक्रमे ९०,०००/- आणि ६०,०००/- रुपये बक्षीस देण्यात येईल.5किमीच्या बॅटल रनसाठी अनुक्रमे ४५,०००/-,३०,०००/- आणि १५,०००/- रुपये अव्वल तीन संघांना मिळतील.

 हौशी अ‍ॅथलीटमध्ये दर्जा कायम रहावा यासाठी पुरुषांसाठी कट ऑफ वेळ ९५ मिनिटे व त्याहून अधिक तरमहिलांकरता १०५ मिनिटे व त्याहून अधिक असेल.अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविणारे पुरुष अ‍ॅथलीट्स ज्यांची वेळ ९५ मिनिटे किंवा त्याहून कमी व महिला अ‍ॅथलीटसाठी १०५ मिनिटे आणि त्याहून कमी असेल तेच सहभाग नोंदविण्यास पात्र असतील.

 इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटासाठी ४२ लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येतात. यामध्ये पुरुषांच्या पुर्ण मॅरेथॉनसाठी २.५ लाख तरपुरुष व महिला अ‍ॅर्धमॅरेथॉनसाठी प्रत्येकी १.२५ लाख रुपये बक्षीस दिले जाते. एलिट गटाव्यतिरिक्त हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी पाच विविध गटात बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेचवसई-विरारमधील अ‍ॅथलीट्सना वेगळे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेचे मार्केटिंग सहयोगी म्हणून मेराकी स्पोर्ट्स व एंटरटेनमेंट यांनी आपले सहकार्य कायम ठेवले आहे. एनर्झाल हे एनर्जी ड्रिंक पार्टनर तरलायन्स क्‍लब डिस्ट्रिक्ट ३२३ ए ३ यांनी स्पर्धेला आपला पाठींबा कायम ठेवला आहे.

 स्पर्धेच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून www.ibvvmm.com.  या संकेतस्थळावर आपल्याला नोंदणी करता येईल. यासोबत फिजिकल नोंदणीला २६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून त्याचे अर्ज वसई- विरारच्या विविध ठीकाणी उपलब्ध असणार आहे. ठीकाणांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. स्पर्धेचे अर्ज www.ibvvmm.comया संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतील.

 स्पर्धेचे पुर्ण मॅरेथॉनसाठीअर्ध मॅरेथॉन आणि ११ किमी रनसाठी नोंदणी शुल्क अनुक्रमे ७५० रुपये अधिक कर असे असणार तर५ किमी स्पर्धेसाठी ७०० रुपये अधिक कर असे असेल. यामध्ये धावपटूंना टाईमिंग चिपधावण्याचा क्रमांक,फिनिशर मेडलरेस फोटोग्राफ आणि स्पर्धा संपल्यानंतर नाश्ता देखील देणार आहोत.

 स्पर्धा मार्गात पुरुष वॉटर आणि एनर्जी ड्रिंक स्टेशन यासह कूल स्पंज आणि ऑरेंज स्टेशन्स देखील असणार आहेत. यासोबत स्पर्धेच्या सुरुवात व शेवटी मेडिकल कॅम्पची सोय करण्यात आली आहे. यासोबत मोटारबाईकवर डॉक्टर्स व ठराविक अंतरानंतर रुग्णवाहिकेची सोय करण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!