वसई-विरार शहरात फिरते दवाखाने सुरु करावा – प्रशांत राऊत

विरार (वार्ताहर) : वसई-विरार शहर महापालिकेच्या क्षेत्रात कोरोना डोके वर काढत आहे दिवसेंदिवस संख्या वाढत चालली असून पावसाळा सुरु झाल्यामुळे शहरात साथीचे आजर देखील होण्याची शक्यता असल्याने ९ प्रभागात फिरते दवाखाने ( मोबाईल व्हॅन) सुरु करावेत अशी मागणी आयुक्त गंगाथरन डी. व महापौर प्रवीण शेट्टी यांच्याकडे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी केली आहे. तसेच महापौरांनी देखील आयुक्तांना पत्र दिले आहे.

वसई-विरार शहर महापालिकेत वसई , विरार , नालासोपारा, आचोळे, बोळींज, चंदनसार, नवघर माणिकपूर, पेल्हार, वालीव असे ९ प्रभाग आहेत.फिरते दवाखाने सुरु करून विभागातील नागरिकांची तपासणी करण्यात यावी तसेच यामुळे उपचारासाठी अन्य कुठे न जात एकाच ठिकाणी तपासणी करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे त्वरित याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी केली आहे. झोडपट्टी, बैठ्या चाळी, घरे, दाटीवाटीच्या वस्तीच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणे किंवा डासांची उत्पत्ती होणे यामुळे साथीचे आजार निर्माण होऊ शकतात जर फिरते दवाखाने महापालिकेने उपलब्ध केले तर तपासणी करून योग्य ते उपचार करता येणे शक्य होणार आहे.
फिरते दवाखाने असल्यास प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता येईल प्रशांत राऊत यांनी केलेली मागणी रास्त असून याबाबत महापालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले आहे. याची अमंलबजावणी झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!