वसई-विरार शहरात बधित रुग्णांचा आकडा १० हजार कडे !

वसई (वार्ताहर) : वसई -विरार शहरात पुन्हा ५ बधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून बाधित रूग्ण संख्या देखील एकदम २९२ इतकी झाली आहे, तर १०८ रुग्णाना घरी देखील सोडण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान शनिवारी वसई- विरार महापालिका हद्दीत २९२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर वसई नालासोपारा हद्दीतील एकूण ५ रुग्णाचा मृत्यू झाल्यानं पालिकेची चिंता वाढली आहे,  त्यामुळेआजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या ९५७६ वर पोहचली आहे. सोबत शहरात एकूण ३०४७ रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.यामध्ये वसई – १०६, नायगाव – ९, वसई-विरार – १५, नालासोपारा – ७३ आणि विरार – ९० तसेच यात एकूण १५६ पुरुष व १३६ महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.

चिंताजनक ; पालिका हद्दीत 5 रुग्णाचा मृत्यू !

महापालिका हद्दीत शनिवारी वसई-विरार शहरातील ५ जणांचा मृत्यु झाल्याने शहराची चिंता वाढली असून यात वसई -२ आणि नालासोपारा ३ अशा एकूण 5 रुग्णाचा समावेश असून आता मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता १८८ इतकी झाली आहे.

दिलासा कमी पण १०७ रूग्ण झाले मुक्त !

वसई-विरार शहरात पुन्हा १०८ रूग्ण पालिका हद्दीतील विविध रुग्णालयातून घरी परतल्याने ही बाब कमी दिलासादायक ठरली आहे. मात्र कोणते रुग्ण कुठल्या रुग्णालय व परिसरातून मुक्त करण्यात आले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही तरीही आजवर मुक्त रुग्णाची एकुण संख्या ६३४० वर पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: