वसई विरार शहर महानगरपालिकेचे नियम धाब्यावर ? सूचना फलकला ब्यानरचा वेढा.

विरार (वार्ताहर) : वसई विरार मधे बहुतेक ठिकाणी एक दिशा दर्शी मार्ग जाहिर करण्यात आले आहेत. जिथे एक तर्फी मार्ग आहेत त्या ठिकाणी एक तर्फी मार्ग चे फलक देखील लावण्यात आले आहेत.

विरारपूर्वेकडील जीवदानी रोड वरील हे दृश्य आहे. विविध पक्ष आपले वर्चस्व दाखवन्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवत आहेत. जयंतीचे,श्रद्धांजलीचे, वाढदिवसाचे ,शिबिराचे ब्यानर लावण्यात आले आहेत. पालिकीचे अतिक्रमण विभाग देखील येथे काना डोळा करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.पालिकेचे अधिकारी डोळे बंद करुण बसले आहेत का ? हेच का स्वच्छ भारत अभियान ? स्वच्छ भारत अभियानाचे ब्यानर लावण्यात आले आहे .त्याच्या वर विविध पक्षाणी आपले ब्यानर सुद्धा लावले आहे. त्यामुळे वाहन चालक सर्व नियम मोडून एक दिशा मार्ग मध्य सरळ गाड़ी घेऊन जातात आणी ट्रफिक ला निमंत्रण देत आहेत. नवीन वाहन चालकांचे ट्राफिक पोलीस अधिकारी वर्गा सोबत भांडण(हुज्जत ) होतात. पालिकेचे सूचना फलक लावण्यात आले आहेत त्याला पूर्ण पणे ब्यानर ने वेढा घातला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!