वाहतूक व्यवस्थेबाबत शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात

‘वाकडी भेंडला’ वळसा घालून वाहनचालकांचा औद्योगिक वसाहतीकडे धोकादायक प्रवास

वसई (प्रतिनीधी) : वसई पूर्व-पश्चीम रेल्वे उड्डाणपूलावरून होत असलेल्या वाहतूक व्यवस्थेत त्वरीत बदल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना नवघर-माणिकपूर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर होत असलेल्या वाहतूककोंडीनंतर आता वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना धोकादायक अपघाती क्षेत्र असलेल्या ठिकाणाहून वळसा घालून येण्यास सांगण्यात येत असल्यामुळे वाहनचालक सद्या जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.

वसई पूर्व व पश्चिम शहराला जोडणारा अंबाडी रेल्वे उड्डाणपूल हा ४० वर्ष जुना आहे. या जुन्या उड्डाणपूलाच्या शेजारी नवीन उड्डाणपूल बनविण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षापासून डागडूगीसाठी  बंद करण्यात आलेला जुना उड्डाणपूल पून्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. मात्र तो हलक्या वाहनांसाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे  असून एकदिशा मार्ग ठेवण्यात आल्यामुळे वसई पूर्व औद्योगिक वसाहतीकडे जाणा-यांना नवीन उड्डाणपूलावरून पुढे ‘वाकडी भेंड’ या अपघाती क्षेत्र असलेल्या ठिकाणाहून वळसा घालून औद्योगिक वसाहतीकडे जावे लागत आहे. या ठिकाणी भरधाव येणारी वाहने व तीव्र वळण याच्या कचाट्यात सापडून मोठा अपघात घेण्याची शक्यता असून वाहतूक पोलिस मात्र बघ्याची भूमीका घेत असल्यामूळे वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.हा जुना उड्डाणपूल दोंन्ही बाजूंच्या वाहनांसाठी सुरू करण्यात यावा अशी मागणी आहे.

वसई पूर्व येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे.त्यामूळे या वसाहतीकडे जाणा-या मार्गावर सतत हलक्या व अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते.वसई पूर्व व पश्चिम या दोंन्ही ठिकाणी वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने उड्डाणपूल संपल्यानंतर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र या सिग्नल यंत्रणेमूळे वाहतूक सुखकर होण्याऐवजी उधीक किचकट करून ठेवण्यात आली आहे. नवीन उड्डाणपूलावरून पूर्वेला औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी पूर्वी वाहनचालकांना यु टर्नचा वळसा सुखकर होता. तो बंद करून १५० मीटर पुढील ‘वाकडी भेंड’ या अपघाती वळणावरून वाहनचालकांना वळसा घालण्यास सांगण्यात आले आहे. सद्या असलेली सिग्नल यंत्रणा ५० मीटर पुढे सरकवून सर्कलची व्यवस्था करण्यात यावी अशी शिवसेनेची मागणी आहे.

त्याचप्रमाणे पश्चिमेकडील उड्डाणपूलाजवळील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्तंभ मुख्य रस्त्याच्या मधोमध उभारलेला असून तो स्तंभ व मोठे जाहिरात होर्डींग २० मीटर मागे हटविल्यास होणारी वाहतूककोंडी संपुष्टात येईल. वसईतील या दोंन्ही  अंबाडी रोड  रेल्वे उड्डाणपूलावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना नवघर-माणिकपूर शहर प्रमूख राजाराम बाबर यांच्या वतीने वसई वाहतूक पोलिस, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग व वसई-विरार महानगरपालिका आयुक्त गंगाथरन डी यांना देण्यात येणार आहे. या वाहतुक व्यवस्थेत लवकरात लवकर बदल करण्यात यावा व वाहनचालकांचा प्रवास सुखकर व वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यात यावी अन्यथा शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!