विद्या विहार हायस्कूल, ज्युनियर कॉलेज वार्षिक महोत्सव राम नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न

विरार (वार्ताहर) : विरार विद्या विहार हायस्कूल ऍंड ज्युनियर कॉलेज (विरार) च्या संचालिका डॉ.मंगला परब यांनी २८ वर्षे पूर्वी १० विद्यार्थी घेऊन शाळा सुरू केली. इवतेसे रोपटे लावले त्याचे आता मोठया वटवृक्षात रूपांतर झाले. या वाटचालीत सुरुवाती पासून ते आतापर्यंत अतिशय मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभलेले व्यक्ती माजी रेल्वेमंत्री, पेट्रोलियम मंत्री, माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांच्या उपस्थितीमुळे डॉ.मंगला परब यांच्या कित्येक  वर्षापासून या कार्यक्रमा संबंधी मनता असलेली इच्छा पूर्ण झाली.

विद्या विहार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ही संस्था डॉ.मंगला परब यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना देणगी न घेता अत्यंत माफक दरात शिक्षण कसे देता येईल हा ध्यास घेतला होता. स्वत:च्या  घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांना पैशासाठी फार कष्ट करावे लागले. ही परिस्थिती  लक्षात ठेवून त्यांनी आपल्या मनाशी खुणगाठ बांधली की गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडेल अशा शाळा, कॉलेजची भविष्यात मी निर्माण करेन व प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शाळेची उभारणी केली. हे कार्य करत असताना विविध समाजपयोगी कार्यात त्या सहभागी होतात. स्वच्छता अभियान, रस्ते सुरक्षा अभियान, अति मोबाईल वापरावर समाज जागृती, भारतीय संस्कृतीबद्दल जाणीव करून देणे, वयोवृध्द व अनाथ आश्रमांना वषोवर्षी भेट देऊन त्यांना वस्तूंचे वाटप करतात. शाळेच्या माध्यमातून आपले विद्यार्थी भारताचे आदर्श नागरिक कसे घडतील याच्यासाठी त्यांची नेहमी प्रयत्न असते, त्यासाठीच्या अविरत कार्य करत आहेत.

या कार्यक्रमात वसई-विरार चे प्रथम महापौर राजीव पाटील मुलांप्रमाणे पालकांना संबोधित करताना म्हणाले की, “शिक्षण घेऊन सुध्दा रोजगार मिळत नाही, त्यामुळे कित्येक मुले डिप्रेशनमध्ये जातात. हे टाळण्यासाठी आधुनिक शिक्षण पध्दतीमध्ये तंत्रज्ञान तसेच उद्योगाची ज्ञान देऊन स्वयंरोजगार कशा करता येईल याविषयीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण केंद्र असलेले रामभाऊ  नाईक  यांनी आरोग्याच्या मंत्र देताना, “वयाच्या ८६ व्या वर्षी मी आपल्यासमोर उभा आहे, यासाठी आमच्या शाळेय जीवनात दररोज २५ सूर्यनमस्कार घालण्याचा नियमच होता आणि त्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलत आहे. मुलांना शिक्षकी किडा होऊ देऊ नका, लहान वयात नंगशिक्षण, व्यायाम, आपल्या संस्कृती विषयी सजग रहा.” जीवनात यशस्वी होण्यासाठी व आनंदाची जीवन जगण्यासाठी त्यांनी चार गुरुमंत्र दिले, “सातत्याने हसत खेळत रहा, दुसऱ्यांना प्रोत्साहन द्यावा त्यांची आवदेलना करू नये. स्वत:चे उत्तम व्यक्तिमत्व निर्माण करून आपला ठसा उमटवा म्हणजे ह्यापेक्षा अधिकाधिक उत्तम सुंदर काम सातत्याने करत राहावे, त्यांनी खासदारकीच्या व मंत्रीपदाच्या कार्यकाळात महिलालसाठी लेडीज स्पेशल ट्रेन सुरु केली. मच्छिमार महिलांसाठी ट्रेनच्या पहिला व शेवटच्या डब्बा मासे ने-आण करण्यासाठी आरक्षित केला. त्यांच्या अशा महान कार्याबद्दल रामभाऊ नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बॉम्बे चे  मुंबई नामकरण करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

डॉ.मंगला परब यांच्या अडचणीत ज्या-ज्या  लोकांनी त्यांना मोलाची साथ दिली त्यापैकी बोळींची येथील समाजसेवक चंद्रकांत  म्हात्रे. म्हात्रे मॅडम यांनी शाळा चालू करण्यासाठी चार गाळे उपलब्ध करून दिले. तसेच शाळेत विद्यार्थी कसे येतील, शाळा रजिस्टर करण्यासाठी मंत्रालयात जाऊन फाइल कशा प्रकारे तयार करून त्याची पूर्तता केली जाते, याबाबत सातत्याने धावपळ करून मंत्रालय व संबंधित ठिकाणी शाळेच्या जडणघडणीत डॉ.मंगला परब यांना मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना श्री मेहता, सचिन बनसोडे, जगदीश गायकवाड, दक्षता परब, संगीत शिक्षक सतीश सर, उप-मुख्याध्यापक कपळ परब यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

मनोरंजनासाठी विद्यार्थ्यांनी डान्य, गाणी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक शिक्षक  व शाळेतील कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. समाजसेवक चंद्रकांत नागरे, सुरेश तावडे शांताराम नाईक, सतीश पवार व पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. हा कार्यक्रम यशवंत नगर (विरार पश्चिम) येथे संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!