विद्युत कंपनीचा वसईतील विजबिलातील गोंधळ संपता संपेना ! जनता दलाचा आंदोलनाचा इशारा

वसई (वार्ताहर) : विद्युत वितरण कंपनीच्याग्रा दिल्याजाणाऱ्या वसईतील वीज बिलातील अनेक प्रकारचा गोंधळ अनेकदा निदर्शनात आणून देखील संपता संपेना अशी अवस्था झालेली असून, स्थानीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या या अनागोंदीचा फटका मात्र ग्राहकास सोसावा लागत आहे. या कार्यपद्धतीचा जनता दलाने निषेध केला असून, बीले वितरणातील दोष काढून लवकरच सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
संत जोसेफ पतपेढीचे चेअरमन, तथा जनता दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व्हॅलेरियन नेमिस घोंसालविस याबाबत म्हणाले की, विद्युत बीले वेळेवर न मिळणे, त्याचप्रमाणे नावात बदल करणे, नवीन वीजबिल घेणे, बिलातील दुरुस्ती व इतर कामाबाबत येथील अभियंते व अधिकाऱ्यांचे ग्राहकास सहकार्य मिळत नसून, या व अश्या कामांसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागितला असता तो देण्यात येत नाही. ही बाब किरवली ( पाली ), वसई या विभागात
 नित्य अनुभवास येत असून, मग ग्राहकांना एम. एस. ई. बी. च्या कार्यालयात येऊन डुप्लिकेट वीज बिल काढावे लागते.
नावात बदल करणे, नवीन वीजबिल घेणे व इतर कामासाठी आपण अर्ज मागितला असता तो देण्यात येत नाही. व तो तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानात मिळेल असे सांगितले जाते. तिथे झेरॉक्सवाले रक्कमेच्या चारपट रक्कम काही दुकानदार घेतात. यामुळे ग्राहकांना प्रचंड प्रमाणात त्रास होतो व बिल वेळेवर भरले न गेल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अशीच परिस्थिती सगळ्याच परिसरात आहे. जनता दलाने या बाबतीत गंभीर दाखल घेतली असून, या प्रकारात लवकर सुधारणा न झाल्यास वसईच्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाविरीधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा व्हॅलेरियन घोंसालविस यांनी जनता दल,वसई शहरातर्फे दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!