विरारची विश्वजा विजय जाधव RISING STAR मध्ये दाखल

विरार : संगीताशी आपल्या सगळयांचे अतूट नाते आहे. संगीत हा मराठी रसिकांच्या जिव्हाळयाचा विषय. संगीताच्या माध्यमातून अनेक भाव-भावना व्यक्त होतात तर काही वेळा जुन्या आठवणींना उजाळाही मिळतो. गाणं ही अशी एक गोष्ट आहे जी लहान-थोर साऱ्यांमध्ये जिव्हाळयाचं नातं निर्माण करतं. विरारच्या विश्वजा विजय जाधव हिला आपण सूर नवा ध्यास नवा मध्ये खूप प्रेम आणि आशिर्वाद दिले. आता लवकरच तिची कलर्स हिंदी ह्या चॅनेल वरील ‘RISING STAR‘   ह्या कार्यक्रमात टीव्ही ऑॅडिशन साठी निवड झालेली असून आपण सर्वांनी voot app वरुन तिला जास्तीत जास्त Live votes करून विजेती होण्यास पात्र ठरवावी. त्यासाठी रसिकांनी ‘वूट एप’ डाऊनलोड करुन त्यावर Live check in येईल. तिथे विश्वजा ला ती गात असताना वोट करायचे आहे.दर शनिवार रविवार रात्री 9 वाजता कलर्स हिंदी ह्या चॅनेल वर प्रसारीत होणार.

तिची आई नेत्रा जोशी जाधव स्वत: संगीत शिक्षिका आणि गायिका आहे. मायलेकींची ही जोडी नुकताच एका रिएलिटी शो मध्ये आपली कला सादर करुन गेली. विश्वजा अवघ्या नऊ वर्षांची असून मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. वडील विजय जाधव गेली 15 वर्षे संगीतक्षेत्रात वादन करत आहेत. बऱ्याच रिएलिटी शोज आणि अनेक बॉलीवूड गायकांना साथसंगत करत आहेत. शाहीर सुखदेव जाधव ह्यांची नात असलेल्या विश्वजाला घरातूनच संगीत क्षेत्राशी नाळ जोडली गेली. तिचे काका रवींद्र जाधव स्वत: संगीत विशारद असून अनेक दिग्गजांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे इतक्या लहान वयातच जाधव घराण्यातल्या विश्वजा ला मिळालेल्या संधीबद्दल विशेष कौतुक होत आहे. वसई विरारमधून सुध्दा तिला अनेक आशिर्वाद मिळत आहेत.

अभिजीत नार्वेकर सोबत बेरीज वजाबाकी ह्या आगामी मराठी चित्रपटासाठी ती गायली आहे. ते लवकरच रसिकांसमोर येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!