विरार-डहाणू चौपदरीकरणार्थ याचिकेची २४ नोव्हेंबरला सुनावणी 

वसई (प्रतिनिधी) : सध्या डहाणु ते वैतरणा परिसरात राहणारे चाकरमनी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, शिक्षक यांना दररोज अफाट गर्दीच्या सामना करीत लोकल प्रवास करावा लागत आहे. दुपदरी मार्गावर लांब पल्ल्यांच्या आणि मालवाहुकी गाड्यांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी लोकल गाड्यांना थांबवून ठेवण्यात येते. पश्चिम रेल्वेच्या महत्त्वकांशी विरार-डहाणु या ६३ किलोमीटर चौपदरीकरण प्रकल्पाच्या ५ हजार ५०० कोटींच्या अंदाजपत्रकाला मुंबई नागरी वाहतूक प्रलकल्प ३ (M.U.T.P) अंतर्गत नीती आयोग व मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर झाल्यास विरार-डहाणु आणि पालघरमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
डहाणु पालघरचे लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. नागरी वस्ती आणि या भागात वाढत असलेल्या व्यावसायिक संकुलांमुळॆ या भागात मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असते. मुंबईहून विस्थापित होणाऱ्या आणि राहिणीमानास नवा पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकांची डहाणु, पालघर, विरार या भागाला पसंती आहे. या भागाचा विकास झपाट्याने होत असला तरी साध्यास्थिती शहर प्रवास वळगत वाहतुकीचे फारसे पर्याय येथील प्रवाशांना उपलब्ध नाहीत. परिणामी वाहुतुक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पालघर-डहाणु शहराकडे जबाबदारीने पाहणे आवश्यक आहे. विरार-डहाणु चौपदरीकरण  होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई हायकोर्ट जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती मा. नरेश पाटील व मा. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!