विरार येथे लायन्स आंतरशालेय कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन

वसई : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला आणि क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी ‘लायन्स क्लब, आगाशी’ तर्फे लायन्स आंतरशालेय कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन दिवस आयोजित या महोत्सवात एकूण ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.

१३ डिसेम्बर ते १५ डिसेंबर दरम्यान विरार पश्चिमेकडील पुरापाडा मैदान आणि के जी हायस्कुल आगाशी येथे लायन्स क्लब आगाशी यांच्यातर्फे लायन्स आंतरशालेय कलाक्रीडा महोत्सव २०१९ संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवामध्ये ६ ते १६ वर्ष खालील मुले आणि मुली यांचा सहभाग असून त्यांच्यासाठी काव्य गायन, कथा कथन, शास्त्रीय नृत्य, चित्रकला, हस्ताक्षर , वक्तृत्व यांसह इतर कला स्पर्धा आणि धावणे, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, व्हॉलीबॉल  यांसह इतर मैदानी वयक्तिक व सांघिक आदी क्रीडा स्पर्धा प्रकारांचा या महोत्सवामध्ये सहभाग असणार आहे.

या स्पर्धेत आगाशी, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, चिखल डोंगरी, बोळींज, उमराळे, नानभट्ट, सत्पाळे, नवापूर, राजोडी, नाळा, राजोडी , निर्मळ,भुईगाव, गास आणि विरार पूर्व पश्चिम येथील या विभागातील ४४ शाळांतून एकूण ५००० पेक्षा जास्त स्पर्धक सहभाग दर्शविणार आहेत.  कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा शुक्रवार १३ डिसेंबर  सकाळी ८.३० वाजता आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट ३२३१ अ ३ चे गव्हर्नर लायन डॉ. अजित जैन हे उपस्थित राहणार आहेत. संस्थेने मागील १० वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा वैद्यकीय महिला सबळीकरण, अपंग, पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती,पर्यावरण पूरक असे अनेक समाज उपयोगी उपक्रम गरजू लोकांसाठी राबविले आहेत. त्यामुळे या उपक्रमासाठी उपास्थित राहून मुलांचे पाठबळ वाढविण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष जयंत नाईक आणि मुख्य विश्वस्त प्रफुल म्हात्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!